भारताच्या पठ्ठ्याने ऑस्ट्रेलियाच्या मुलीला थेट मैदानातच केलं प्रपोज; व्हिडिओ पाहाच
वायरल झालं जी

भारताच्या पठ्ठ्याने ऑस्ट्रेलियाच्या मुलीला थेट मैदानातच केलं प्रपोज; व्हिडिओ पाहाच

सिडनी : ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पण मैदानाबाहेर एका भारतीय पठ्ठ्याने एका ऑस्ट्रलियन मुलीला प्रेक्षाक गॅलरीत प्रपोज केल्याचे पाहायला मिळाले. त्याने सर्व प्रेक्षकांत तिच्या हातात रिंगही घातली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मैदानावर भारताकडून विराट कोहली आणि श्रेयस अय्यर फटकेबाजी करत असताना भारतीय चाहत्याने वेळ साधत सामना पाहण्यासाठी आलेल्या आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. महत्वाची गोष्ट म्हणजे या पठ्ठ्याच्या गर्लफ्रेंडनेही त्याला लग्नासाठी होकार देत त्याला होकार दिला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने शतकी खेळी करत संघाला ३८९ धावांचा डोंगर उभारुन दिला. सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली.

क्रिकेटच्या मैदानावर बऱ्याचवेळा काही अतरंगी गोष्टी घडताना आपण पाहिल्या आहेत. मग स्टेडीयमवर उपस्थित असलेले प्रेक्षक सुरक्षा कवच मोडून खेळाडूंना भेटायला येतात तर कधी एखाद्या सामाजिक मुद्द्यावरही क्रिकेटच्या मैदानावर निदर्शन करण्यात येतात. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील सिडनी येथील दुसऱ्या वन-डे सामन्यात या भारतीय चाहत्याने मौके पे चौका मारला असून सध्या सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा आहे. भारतीय चाहत्याने प्रपोज केलेला व्हिडिओही सध्या जोरदार व्हायरल होत आहे.