पंडित नेहरूंची बॅटिंग पाहिलीत का? ६९ वर्ष जुना Video Viral
वायरल झालं जी

पंडित नेहरूंची बॅटिंग पाहिलीत का? ६९ वर्ष जुना Video Viral

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांची जंयती नुकतीच साजरी करण्यात आली. १४ नोव्हेंबर रोजी नेहरूंच्या जयंती निमित्तानं देशभरात ‘बालदिन’ साजरा करण्यात येतो. (Children’s Day 2022) या निमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं. दरम्यान याच पार्श्वभूमीवर जवाहरलाल नेहरू यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ते चक्क क्रिकेट खेळताना दिसतायेत. ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरप्रमाणे जोरदार फटकेबाजी करताना दिसतायेत. (Jawaharlal Nehru playing Cricket) त्यांची बॅटिंग स्टाईल पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी अक्षरश: स्टेडियम खचाखच भरला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुर्मीळ व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ ६९ वर्ष जुना आहे. १९५३ साली दिल्लीमध्ये आयोजित एका चॅरिटी मॅचमध्ये नेहरू खेळले होते. त्यांना क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड होती. ते एक उत्तम फलंदाज होते. असं म्हटलं जातं, की जर त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नसता तर कदाचित ते एक उत्तम क्रिकेटपटू झाले असते. पण राजकारणात सक्रिय झाल्यामुळे त्यांचं क्रिकेट हळूहळू मागे पडत गेलं

राजकिय नेते खेळले क्रिकेट

१९५३ साली लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांमध्ये ही मॅच आयोजित करण्यात आली होती. देशातील सर्व प्रमुख राजकिय नेत्यांनी या क्रिकेट मॅचमध्ये भाग घेतला होता. या मॅचमध्ये नेहरूंनी केवळ एकच धाव काढली होती. त्यांना मैदानावर खेळताना पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. क्रिकेटसोबत नेहरूंना इतर खेळांची देखील आवड होती. भारतीय खेळाडूंना ते कायम प्रोत्साहन देत असतं. पंडित नेहरूंच्या जयंती निमित्तानं तो दुर्मीळ व्हिडीओ आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.