कायरन पोलार्डचा कार अपघातात मृत्यू झाल्याचा व्हिडिओ व्हायरल
वायरल झालं जी

कायरन पोलार्डचा कार अपघातात मृत्यू झाल्याचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई : मुंबई इंडियन्सचा आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटर कायरन पोलार्डचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका युट्यूब व्हिडीओमुळे कायरन पोलार्डचा अपघातात मृत्यू झाल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली असता असं काहीही नसल्याचं समोर आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

युट्यूबवर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर सत्यता पडताळून पाहिली असता ही बातमी पूर्णत: खोटी आहे. पोलार्ड सध्या अबुधाबी येथे सुरू असलेल्या टी-१० लीगमध्ये खेळत आहे. व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावेळी पोलार्ड मैदानावर सामना खेळत होता. पोलार्ड या लीगमध्ये डेक्कन ग्लेडिएटर्स संघाचे नेतृत्व करत आहे. काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर कधी काही व्हायरल होईल याचा नेम नाही. एखादी घटना खरी असो अथवा खोटी, लोक बंद डोळ्यांनी विश्वास ठेवतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अथवा सतत समोर येणाऱ्या व्हिडीओ, फोटो अथवा एखाद्या घटनेवर बंद डोळ्यांनी विश्वास ठेवू नका असे आवाहन सायबर पोलिसांकडून सातत्याने करण्यात येत आहे.