Tiger
वायरल झालं जी

Video : सिंह करत होता गायींची शिकार पण लोकं घेत होते सेल्फी; तेही 100 मीटर जवळून

नवी दिल्ली : जंगलातील सर्वात हिंस्त्र पशू कोण असं जरी म्हटलं की आपल्या समोर लगेच येतो तो म्हणजे वाघच. सिंह जरी पाहिला तर नुसता थरकाप उडतो. तो जरी दिसला तरी आपण कोसोमीटर दूर जातो. पण इथं मात्र भलतंच पाहिला मिळत आहे. कारण जेव्हा सिंह गायींची शिकार करत होता. तेव्हा काही लोकं त्याच्याजवळ म्हणजे अवघ्या 100 मीटर अंतरावर उभे राहिले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गायींची शिकार करणाऱ्या सिंहाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे, की सिंह गायींची शिकार कसा करतोय ते. तसेच हा सिंह हळूच गायीवर हल्ला करतो. ही शिकार होत असताना काही लोकं कोणतीही खबरदारी न घेता व्हिडिओ शूट करीत आहे. ते सिंहाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकं सिंहाच्या शिकारीचा व्हिडिओ शूट करीत होते. हा व्हिडिओ गिर जंगलातील असल्याचे सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत