वायरल झालं जी

पाठ खाजविण्यासाठी केला जेसीबीचा वापर; व्हिडिओ तुफान व्हायरल

नवी दिल्ली : कोण कोणत्या साधनाचा कोणत्या गोष्टीसाठी वापर करेल हे काही सांगता येत नाही. सध्या असाच एक जेसीबीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने जेसीबीचा वापर चक्क आपली पाठ खाजविण्यासाठी केला आहे.
————-
आणखी वाचा :
अपंग व्यक्तींच्या मदतीसाठी हृतिक रोशनचा पुढाकार
————-
मराठी व्याकरणाला तर्कशुद्ध करणारे तर्खडकर
————-

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मोठमोठ्या इमारती आणि खोदकाम करण्यासाठी वापरली जाणारी जेसीबी मशिन चक्क पाठ खाजविण्याचे काम करताना दिसत आहे. एका व्यक्तीची पाठ खाजवत होती. त्यावेळी तो व्यक्ती स्वतःची पाठ खाजविण्यासाठी पाठीला हात पुरत नसल्याने टॉवेलचा वापर करत होता. परंतु अखेर त्याने जेसीबीच्या सहाय्यानेच पाठ खाजविण्याचा निर्णय घेतला.

हे दृश्य चालू असताना व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीलाही जोरदार हसू येत आहे. तो आपले हसू थांबवू शकत नसल्याचे दिसत आहे. दैनंदिन जिवनात पाठ खाजविण्यासाठी जेसीबीसारख्या साधनाचा वापर करत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यावेळी ही वृद्ध व्यक्तीही जेसीबी पाठ खाजवत असल्याच्या गोष्टीचा आनंद घेताना दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत