आई शेवटी आईच असते! माकडानं पाजलं वाघांना दूध, अचंबित करणारा व्हिडीओ व्हायरल
वायरल झालं जी

आई शेवटी आईच असते! माकडानं पाजलं वाघांना दूध, अचंबित करणारा व्हिडीओ व्हायरल

माणूस या पृथ्वीवरील सर्वात बुद्धीजीवी प्राणी आहे. माणसाकडे बुद्धीसोबतच भावना देखील आहेत. त्यामुळेच त्याला इतकी प्रगती करता आली असं म्हटलं जातं. पण माणूसकी केवळ माणसाकडेच असते असं नाही. प्राण्यांना देखील प्रेमाचा अर्थ कळतो. मायेचा स्पर्श जाणवतो. प्राण्यांमध्ये देखील तितकीच माया असते. याचिच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. एक माकड चक्क वाघाला दूध पाजत आहे. अन् हे वाघाचं पिल्लू देखील आपल्या आईप्रमाणे माकडाच्या अंगाखांद्यावर खेळतंय. हा व्हिडीओ पाहून कदाचित तुम्ही देखील गहिवरून जाल.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

माकड झालं वाघांची आई?

वाघ हा जंगलातील अत्यंत घातक आणि आक्रमक शिकारी मानला जातो. तो सिंहाप्रमाणे एकत्र कुटुंबात राहात नाही. उलट तो एकटाच राहाणं पसंत करतो. पण या व्हिडीओमध्ये तर वाघाची पिल्लं चक्क माकडाच्या हातून दूध पिताना दिसतायेत. अन् ते माकड देखील स्वत:च्या पिल्लांप्रमाणेच वाघांचा सांभाळ करतेय. त्यांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवते. माकड त्या वाघांना आईप्रमाणेच

व्हिडीओ होतोय व्हायरल

हा व्हिडीओ IFS अधिकारी Samrat Gowda यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. आतापर्यंत हा व्हिडीओ हजारो नेटकऱ्यांनी पाहिला आहे. माणूस कधी एकमेकांचा आदर करायला शिकणार? अशा आशयाच्या प्रतिक्रिया या या व्हिडीओवर केल्या जात आहेत.