मसाला डोसा ५० वर्षांपूर्वी किती रुपयांना मिळायचा? बिल पाहाल तर थक्क व्हाल
वायरल झालं जी

मसाला डोसा ५० वर्षांपूर्वी किती रुपयांना मिळायचा? बिल पाहाल तर थक्क व्हाल

सोशल मीडियावर व्‍हायरल होणार्‍या  फोटो, व्हिडीओमधून अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर येतात. सोशल मीडियावर जुन्या लग्नपत्रिका, विविध वाहनांची बिले देखील अनेकांचे लक्ष वेधून घेतात. अशाचप्रकारे एका हॉटेलचे ५० वर्षापूर्वीचे बिल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बिलावरील डोसा आणि कॉफीची किंमत पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल, चला तर पाहूया त्‍या काळातमसाला डोसा अन् कॉफीसाठी (Masala Dosa Bill Viral) किती रुपये मोजावे लागत होते याविषयी…

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सोशल मीडियावर पाहायला मिळणाऱ्या या बिल दिल्लीमधील  मोती महल रेस्टॉरंटचे आहे. व्हायरल होणारे हे बिल हे २८ जून, १९७१ तारखेचे आहे. या बिलावर मसाला डोसा आणि कॉफीची ऑर्डर देण्यात आल्याचे दिसते. बिलात मसाला डोसा किंमत १ रुपया तर कॉफीची  किंमतही १ रुपयाच आहे. एकूण २ रुपये बिलावर ६ पैसे सेवाकर आणि १० पैसे सर्विस चार्ज लावण्यात आला आहे. म्हणजे हे बिल एकूण २ रुपये १६ पैशाचे हे बिल (Masala Dosa Bill Viral) आहे.

ट्विटरवर @indianhistory00 नावाच्या अकाऊंटवरून ही पोस्ट (Masala Dosa Bill Viral) शेअर करण्यात आली आहे. ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. ही पोस्ट 1 फेब्रुवारी 2017 रोजी शेअर करण्यात आली होती, जी पाहून युजर्सही थक्क झाले आहेत. हे बिल पाहून १९७१ मधील स्‍वस्‍ताई आणि आताचे प्रचंड वाढलेली महागाई पाहून खरंच थक्क व्हायला होतं, अशी प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिली आहे. या महागाईच्या युगात दोन रुपयात पोटभर नाष्ट्याचे हे बिल पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *