वायरल झालं जी

नांदेडकर म्हणतायेत ‘हा तर सामान्य जनतेचा मुख्यमंत्री’; मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल

नांदेड : हिंगोली-नांदेड जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रस्ते, छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. परिसरातील शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. दिल्ली दौऱ्यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसना नदीला आलेल्या पूराबाबतच्या सद्यस्थितीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे घेतली.पूरग्रस्तांची सर्व व्यवस्था करावी तसेच कोणतीही जीवितहानी होणार नाही यास प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नांदेड जिल्ह्यात मूसळधार पाऊस होत आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ८७ पैकी ३१ महसुल मंडळात ढगफुटी झाली आहे. शेतीच मोठ नुकसान झालं आहे. पिक, खतं, बीयाणे, पूरात वाहून गेले आहेत.

पुराच्या पहिल्याच दिवशी आज सकाळीच जिल्ह्यातील वर्ग एकचे अधिकारी अर्थात गट विकास अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक ग्रामीण भागात पोहचून प्रत्यक्ष पाहणी करतांना आढळून आले. सत्तेवर नविन सरकार आल्याचा हा परिणाम आहे. असे मानले तर गैर ठरू नये याचा पुरावा म्हणून येथे मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी दिल्ली ईथून नांदेड चे जिल्हाधिकारी यांना आसना नदीला आलेल्या पूरा विषयी पूरात आडकलेल्या लोकांना मदत करण्याविषयी आदेश दिले.

दुसऱ्या एका घटनेचाही व्हिडिओ समोर आला आहे. अमरावती विभागात दूषित पाण्यामुळे बीमार पडलेल्या नागरिकांची तेथील जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क करून त्यांना नागरीकाच्या आरोग्याची काळजी घेण्याविषयी तसेच मृतांच्या नातेवाईकांना शासकीय निधीतून आर्थिक मदत तात्काळ देण्याविषयी मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री दिसत आहेत.

सामान्य जनतेच्या विषयी जीव्हाळा बाळगणारा पहिला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पुढे येत आहेत. त्यांच्या या अफाट कार्यशैलीमुळे ते लवकरच यशस्वी होतील अशी अपेक्षा करता येईल. अशी फेसबुक पोस्ट नांदेड येथील पत्रकार आनंद कल्याणकर यांनी केली आहे.