पंतप्रधान मोदींचा २०१५चा जुना व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
वायरल झालं जी

पंतप्रधान मोदींचा २०१५चा जुना व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

नवी दिल्ली : महाराष्ट्रात पेट्रोलचे दर शंभरीपार गेले असताना सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक २०१५चा जुना तुफान व्हिडिओ व्हायरल होत आहे. आज तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २४ पैसे आणि डिझेलच्या दरात २९ पैशांची वाढ केली आहे. मंगळवारी पेट्रोल २३ आणि डिझेल २७ पैसे महाग झाले होते. विरोधकांनी पट्रोलने दरवाढीवरून मोदी सरकारला घेरले आहे. सोशल मिडियावर नागरीक संताप व्यक्त करत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आधीच करोना महामारीचे संकट आणि आता महागाईचे संकट येऊन ठेपले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये नरेंद्र मोदी आपल्या नशीबामुळे देशात पेट्रोलचे भाव कमी झाले आहेत तर जनतेसाठी चांगलंच आहे, असे म्हणाले होते. २०१५ मधील एका रॅलीतील हा व्हिडिओ आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. आपल्या नशीबामुळे देशात पेट्रोलचे भाव कमी झाले आहेत तर जनतेसाठी चांगलंच आहे, असं पंतप्रधान २०१५ मध्ये जाहीर भाषणात सांगत होते. आता २०२१ मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे, आता कुणाचं नशीब म्हणायचं प्रधानमंत्री महोदय?, असा खोचक प्रश्न नवाब मलिक यांनी विचारला आहे.