वायरल झालं जी

आश्चर्यकारक ! पत्रकाराने घेतली गाढवाची मुलाखत; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क लावणं, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशन यासारखे खबरदारीचे उपाय हे अत्यंत महत्वाचे आहेत. मात्र अनेक ठिकाणी या नियमांचं उल्लंघन केले जात आहे. अशा प्रकारे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या लोकांना धडा शिवकविण्यासाठी एका पत्रकाराने भन्नाट आईडिया केली असून त्याने थेट गाढवाचीच मुलाखत घेतली आहे.

या पत्रकाराने चक्क गाढवाची मुलाखत घेऊन मास्क न लावणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. हा व्हिडीओ पाहून थोडं हसू येईल मात्र पत्रकाराच्या भन्नाट कल्पनेचं तुम्हीही भरभरून कौतुक कराल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. पत्रकाराने मास्क न लावता रस्त्यावर बसलेल्या गाढवाला त्याने काही प्रश्न विचारले आहेत. त्यानंतर त्याने रस्त्यावर मास्क न लावता फिरणाऱ्या लोकांनाही प्रश्न विचारला. जे मास्क न लावता फिरत आहेत त्यांची तुलना गाढवासोबत केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

अशा अनोख्या पद्धतीने पत्रकाराने केलेल्या या जनजागृतीने सर्वांचंच मन जिंकलं असून कौतुक केलं जात आहे. सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो, तरीही लोक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. अशात हा पत्रकाराने घेतलेल्या मुलाखतीचा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान, देशातही कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोनग्रस्तांची संख्याही तब्बल 11 लाखांच्या वर गेली असून कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात 28,732 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.