गल्ली क्रिकेटमधल्या पोरांसारखी पाकिस्तानी खेळाडूंची मैदानात भांडणं; व्हिडिओ व्हायरल
क्रीडा वायरल झालं जी

गल्ली क्रिकेटमधल्या पोरांसारखी पाकिस्तानी खेळाडूंची मैदानात भांडणं; व्हिडिओ व्हायरल

अबूधाबी : पीएसएलमध्ये पाकिस्तानच्या दोन क्रिकेटपटूंनी मैदानातच एकमेकांशी पंगा घेतला असून या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहीन आफ्रिदी आणि माजी कर्णधार सरफराज अहमद या दोघांचं पीएसएलमध्ये लाहोर कलंदर्स आणि क्वेट्टा ग्लॅडिएटर्स यांच्यातल्या सामन्यात भांडण झालं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ग्लॅडिएटर्सची बॅटिंग सुरू असताना 19 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली जेव्हा शाहीन आफ्रिदीने सरफराजला बाऊन्सर टाकला. हा बाऊन्सर सरफराजच्या हेल्मेटला लागला आणि अंपायरने नो बॉल दिला. सरफराजच्या हेल्मेटला लागलेला बॉल थर्ड मॅनच्या दिशेला गेला, यानंतर त्याने आणि हसन खानने एक रन काढली. नॉन स्ट्रायकर एण्डला आल्यानंतर सरफराज शाहीनला काहीतरी म्हणाला, यानंतर शाहीन आफ्रिदी भडकला. एवढच नाही तर त्याने सरफराजच्या जवळ जाऊन प्रतिक्रियाही दिली.

शाहीन आफ्रिदी सरफराजच्या जवळ जात असतानाच अंपायर मध्यस्ती करण्यासाठी आले, त्याचवेळी कलंदर्सचा मोहम्मद हाफीज आणि कर्णधार सोहेल अख्तरही दोघांना शांत करण्यासाठी पुढे सरसावले. यानंतर सरफराजने झालेल्या वादाबद्दल अंपायरशी चर्चा केली. सामना संपल्यानंतर शाहीन आफ्रिदीला या घटनेबाबत विचारण्यात आलं, तेव्हा त्याने खेळामध्ये अशा गोष्टी होतच असतात, अशी प्रतिक्रिया दिली. आफ्रिदीच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटले. आफ्रिदीने आपल्या माजी कर्णधारासोबत असं वागायाला नको होतं, असं अनेक जण म्हणाले. तसंच वरिष्ठ खेळाडूंना मान देणं गरजेचं असल्याच्या प्रतिक्रियाही काहींनी दिल्या.