गोलगोल चक्कर मारणाऱ्या मेंढ्यांचं रहस्य अखेर उलगडलं; संपूर्ण जग झालं होतं हैराण
वायरल झालं जी

गोलगोल चक्कर मारणाऱ्या मेंढ्यांचं रहस्य अखेर उलगडलं; संपूर्ण जग झालं होतं हैराण

मेंढ्यांची अशी विचित्र वागणूक त्याच्या मालकासह तज्ज्ञांसाठीही रहस्य बनलं होतं. पण आता यामागील कारण समजल्याचा दावा केला जातो आहे. गेले काही दिवस एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले. किंबहुना या व्हिडीओने संपूर्ण जगाला कोड्यात टाकलं. मेंढ्यांचा हा व्हिडीओ. या मेंढ्यांची वागणूक इतकी विचित्र आहे की त्यांचं वागणं रहस्य बनलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मेंढ्याचा हा व्हिडीओ नेमका कुठला आणि काय प्रकरण आहे हे तुम्हाला माहिती नसेल तर आधी नेमकं काय प्रकरण आहे ते आपण पाहुयात. तुम्हाला माहितीच असेल की मेंढ्या एकामागोमाग एक चालतात. म्हणजे मागील मेंढी आपल्या पुढील मेंढीला फॉलो करते. तिच्याच पावलांवर पाऊल टाकते. अशा पद्धतीने मेंढ्यांचा कळप एका रांगेत चालताना दिसेल. पण या व्हिडीओत मात्र मेंढ्या गोलगोल फिरत आहेत. एकाच वर्तुळात त्या फिरताना दिसत आहेत.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सीसीटीव्ही फुटेजमध्ये मेंढ्या गोलाकार फिरताना दिसत आहेत. मोठं वर्तुळ त्यांनी केलं आहे आणि याच वर्तुळाभोवती त्या फिरत आहेत. काही मेंढ्या त्यांच्या आजूबाजूला उभ्या आहेत. तर याच व्हिडीओच्या पुढील व्हिडीओत जो एका कॅमेऱ्यात शूट करण्यात आला आहे. त्यामध्ये काही मेंढ्या त्या वर्तुळाच्या आतही दिसत आहेत. माहितीनुसार या मेंढ्या काही खातपितही नाही आहेत. पण तरी त्या ठणठणीत आहेत.

पीपील्स डेली चाइनाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार उत्तर चीनच्या मंगोलियातील ही घटना आहे. शेकडो मेंढ्या दहा दिवसांपेक्षा अधिक दिवस एका वर्तुळात गोलगोल फिरत आहे. मेंढ्या तशा निरोगी आहेत पण त्यांच्या या विचित्र वागण्याचं रहस्य बनलं.

मीडिया रिपोर्टनुसार मेंढ्यांचा मालकही हैराण झाला. त्याने सांगितलं की सुरुवातीला काही मेंढ्या असं करत होत्या पण आता संपूर्ण कळप असा करू लागला आहे. त्यांच्या या वागणुकीचं कारण त्यांनाही माहिती नाही.

तज्ज्ञांच्या मते, लिस्टेरियोसिस नावाच्या एका जीवाणूजन्य आजारामुळे प्राण्यांचं व्यवहार असा होतो. या आजाराच त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो. मेंदूला सूज येते आणि मग भटकल्यासारखं वाटतं, शरीरारला लकवाही मारू शकतो.

पण या मेंढ्यांच्या अशा वागणुकीचं नेमकं कारण हेच आहे की आणखी काही ते मात्र माहिती नाही. तुम्हाला याबाबत काही माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

आता यूकेच्या ग्लूसेस्टरमधील हार्टपुरी युनिव्हर्सिटीच्या कृषी विभागातील प्राध्यापक मॅट बेल यांनी मेंढ्यांच्या या विचित्र वागण्याचं नेमकं कारण सांगितलं आहे. न्यूजवीकशी बोलताना त्या म्हणाल्या, असं वाटतं की या मेंढ्या बऱ्याच कालावधीपासून या कुंपणाच्या आत आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्टिरियोटाइपिक झाला आहे. म्हणजे एकाच आणि मर्यादित ठिकाणी राहिल्याने मेंढ्या निराश झाल्या आहेत आणि त्या गोलगोल चक्कर मारत आहेत. त्यानंतर काही मेंढ्यांना पाहून इतर मेंढ्याही त्यांच्याप्रमाणे वागू लागल्या.