वायरल झालं जी

फक्त तीस रुपय न दिल्यानं, सहा वर्षांच्या चिमुरड्याला ढकलावं लागलं स्ट्रेचर.. पहा व्हिडीओ

नवी दिल्लीः कोरोना महामारीच्या काळात लोकांना खूप समस्यांचा सामना करावा लागत आहे, दिवसरात्र काम करत रुग्णालये कोरोनाचा सामना करत आहेत. तर काही ठिकाणी पैशांची मागणी करत रुग्णांना वाईट वागणूक दिली जात आहे. उत्तर प्रदेशातील रुग्णालयात तीस रुपये दिले नाहीत म्हणून सहा वर्षांच्या चिमुरड्याला स्ट्रेचर ढकलावे लागले आहो. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

उत्तर प्रदेशातील देवरीया जिल्हयातील ही घटना आहे. गौरा या गावतील छेदी यादव या व्यक्तीचे काहीजणांसोबत भांडण झाले होते. त्यात ते जखमी झाल्याने त्यांना देवरीया सर्जिकल वॉर्ड मध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हा छेदी यादव यांची मुलगी बिंदु ही त्यांच्यासोबत होती. रुग्णालयात वडिलांना ड्रेसिंगसाठी स्ट्रेचरवर घेऊन जाण्यासाठी वॉर्डबॉय तीस रुपय मागत होता. पण आर्थिक परिस्थीती चांगली नसल्याने बिंदू आणि तीचा सहा वर्षांचा मुलगा दोघेच स्ट्रेचरवरुन वडिलांना ड्रेसिंग रुम पर्यंत घेऊन गेले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान देवरीया जिल्हा रुग्णालय प्रशासनाने घटनेची दखल घेतली आहे, संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेश कॉग्रेसचे नेते अजय कुमार य़ांनी हा व्हिडीओ पोस्ट करत देवरीया येथे तो मुलगा उत्तर प्रदेशच्या बंद पडलेल्या व्यलस्थेला धक्का देत आहे असे ट्विट केले आहे.