वायरल झालं जी

हैद्राबादच्या पराभवानंतर त्या तरुणीचे फोटो व्हायरल! कोण आहे ती?

चेन्नई : बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैद्राबादच्या सामन्यात हैद्राबादच्या पराभवानंतर हैद्राबादचे असंख्य चाहते नाराज असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या पराभवानंतर एका तरुणीचे निराश झालेले फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. सनरायजर्सचे फलंदाज जसजसे तंबूत परतत होते, तसतशी या तरुणीच्या चेहऱ्यावरची निराशा वाढत होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोण आहे व्हायरल फोटोंमधली तरुणी?
फोटो व्हायरल झालेल्या तरुणीचं नाव आहे काव्या मारन असे आहे. सनरायजर्स हैदराबाद ग्रुपचे मालक कलानिधी मारन यांची ती मुलगी आहे. शिवाय, ती सनरायजर्स हैद्राबादची सीईओदेखील आहे. जेव्हा हैद्राबादच्या डेक्कन चार्जर्स संघाला आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली, तेव्हा सनरायजर्स हैद्राबादची स्थापना करण्यात आली.

कलानिधी मारन यांच्या सन ग्रुपकडे सनरायजर्स हैद्राबादची मालकी आहे. त्यांचीच मुलगी आणि संघाची सीईओ काव्या मारन ही काल आपल्या संघाचा सामना बघण्यासाठी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर उपस्थित होती. पण संघाची कामगिरी पाहून काव्या मारनचा हिरमोड झाला आणि तिचे हेच हावभाव दाखवणारे फोटो कालपासूनच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

नेमकं काय झालं?
हैद्राबादच्या डावात १७वं षटक बंगळुरूच्या शाहबाज अहमदनं टाकलं. त्या एका षटकामध्ये त्यानं संपूर्ण सामनाच बंगळुरूच्या बाजूने झुकवला. एकाच षटकात शाहबादनं हैद्राबादच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं. त्यामुळे हैद्राबादच्या हातात असलेला सामना निसटला. यानंतर लगेचच स्क्रीनवर काव्या मारन दिसू लागली. आपल्या संघाच्या कामगिरीमुळे झालेली निराशा तिच्या चेहऱ्यावर अगदी सहज दिसत होती. तिचे फोटो सोशल मीडियावर लगेचच व्हायरल होऊ लागले. हैद्राबादच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर हे फोटो व्हायरल करत आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. काही नेटिझन्सनी तिच्या फोटोंवर मीम्स देखील बनवले !

Leave a Reply

Your email address will not be published.