वायरल झालं जी

कार पार्क करण्यासाठी तरुणाची भन्नाट शक्कल; पाहा व्हिडीओ

मोठी गाडी असेल तर सगळ्यात मोठा प्रश्न पार्किंगचा असतो. अनेकवेळा कार पार्क करायला जागा मिळत नसल्यामुळे गाडी रस्त्यावर पार्क करावी लागते मात्र तिथेही धोका असतोच कारण गाडी उचलून नेण्याची भिती असते. तसेच रस्त्यावर जागा जर छोटी असेल तर गाडी पार्क करता येत नाही. याच सगळ्या कार पार्किंगच्या समस्यांवर एका तरुणाने भन्नाट शक्कल शोधून काढली आहे. तुम्ही देखील या तरुणाची नामी शक्कल पाहूण  चक्रावून जाल.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या सोशल मीडियावर या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अगदी कमी जागेत मोठी पार्क केलेली कार योग्य कौशल्य दाखवत एक तरुण बाहेर काढली आहे. अगदी कमी जागेतही गाडी व्यवस्थित  पार्क करणं आणि तिथून पुन्हा रस्त्यावर आणणं यासाठी कौशल्याएवढाच आत्मविश्वासही असावा लागतो असं कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे.

 

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अक्षरशः लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 842.9 हजार लोकांनी पाहिला आहे. तर 7 हजारहून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत