वायरल झालं जी

जिओनं व्होडाफोन अन् आयडियाच्या नव्या ब्रॅण्डला दिल्या हटके शुभेच्छा; मारलाय डोळा

मुंबई : व्होडाफोन आणि आयडियाचं विलीनीकरण पूर्ण होऊन नवीन ब्रॅण्डची घोषणा आज (ता. ०७) करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा प्रतिस्पर्धी असणाऱ्या जिओनं त्यांना एकदम हटके अंदाजात ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. हे ट्विट सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. जिओच्या ट्विटर अकाऊंटवरुन व्होडाफोन आणि आयडियाला टॅग करुन एक ट्विट करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये कंपनीच्या नव्या नावाचा अगदी कल्पकतेने वापर करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रिलायन्सने जिओच्या माध्यमातून दूरसंचार क्षेत्रामध्ये पदार्पण केल्यानंतर व्होडाफोन आणि आयडिया कंपनीने विलीनीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता कंपनीने दोन्ही कंपन्यांची नाव एकत्र करुन Vi नावाचा ब्रॅण्ड लॉन्च केला आहे. याच निर्णयाचे स्वागत करताना जिओने दोन्ही कंपन्यांना नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

वी लव्ह टू सी यू टूगेदर म्हणजेच तुम्हाला दोघांना एकत्र बघून आम्हाला आनंद झाला असं जिओनं म्हटलं आहे. यामधील वी म्हणजे आम्हाला हा शब्द WE असा न वापरता व्होडाफोन आणि आयडियाची नवीन ओळख असणारे ब्रॅण्डनेम म्हणजेच Vi असा वापरला आहे. त्याच प्रमाणे जिओने स्वत:च्या नावाचाही कल्पकतेने वापर करत व्हिडाफोन आणि आयडियाला जिओ टूगेदर म्हणजेच असेच एकत्र राहा असा मजेदार सल्लाही दिला आहे. तसेच पुढे जिओकडून खूप सारं प्रेम या अर्थाचा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे. तसेच डोळा मारणारा इमोन्जीही जिओच्या ट्विटमध्ये वापरण्यात आला आहे.

मूळ बातमी वाचा : वोडाफोन आणि आयडियाचे विलनीकरण करुन नवा ब्रँडची घोषणा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत