वायरल झालं जी

धमाल व्हायरल व्हिडीओ.. समोसा विकणाऱ्या चिमुरड्याचा काकूंशी युक्तिवाद

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. मागे वर्षभरापूर्वी एका तरुणाशी 1800 रुपयांच्या हिशेबावरुन वाद घालणाऱ्या काकू सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. असाच एक व्हिडीओ आताही व्हायरल झाला आहे. फरक फक्त एवढाच आहे काकूंची जागा घेतलीय एका समोसा विकणाऱ्या चिमुरड्याने आणि तो वाद घालतोय समोसा विकत घेणाऱ्या काकूंशी..

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

व्हायरल व्हिडीओत नेमके काय ?
एक चिमुरडा समोसे विक्री करतोय. तो एका काकूंच्या घरी समोसे विकण्यासाठी जातो. पाच रुपयांना एक समोसा याप्रमाणे काकू त्याच्याकडून चार समोसे घेतात. म्हणजेच एकूण 20 रुपयांचे समोसे काकू त्या चिमुरड्याकडून विकत घेतात. पण माझ्या 4 समोस्यांची किंमत 5 रुपयांप्रमाणे 40 रुपये होतीय, असं तो लहान मुलगा काकूंना सांगतोय.

व्हायरल व्हिडीओत काकू त्याला समजावून सांगताना दिसून येत आहेत की एक समोसा 5 रुपयांना, दोन समोसे 10 रुपयांना मग आणखी दोन समोरे 10 रुपयांना.. असे म्हणत असताना ते 2-2 समोसे त्याच्या हातावर ठेऊन त्याला समोस्याचा हिशेब सांगत असतात. मात्र काकूंचे सगळे ऐकल्यावर मुलगा आपल्या 40 रुपयांच्या हिशेबावर ठाम राहतो.

काकू आणि समोसा विकणाऱ्या मुलाची हिशेब प्रक्रिया बघून साहजिक शेजारी उभ्या असणाऱ्या तरुणाने हा सगळा प्रसंग आपल्या कॅमेरात टिपला. हा तरुण देखील चिमुरड्याला 20 आणि 40 रुपयांचा हिशेब समजावून सांगत होता. पण मुलगा मात्र ऐकायला तयार नव्हता. साहिजक हा व्हिडीओ पाहून हसू अनावर झाल्याशिवाय राहत नाही.

हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. एक गट मुलाबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहे तर एक गट मुलाची चेष्टा उडवताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगात व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *