Body_Viral
वायरल झालं जी

मृतदेह समजून जमली गर्दी पण जेव्हा ‘ती’ व्यक्ती उठली मग झालं असं काही…

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे मोठी भीती निर्माण झाली आहे. कोणतीही बेवारस वस्तू किंवा अज्ञात व्यक्ती रस्त्यावर पडलेली दिसली की त्याकडे संशयाने पाहिले जाते. अशाचप्रकारे एक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला झोपली होती. ही व्यक्ती पांढऱ्या रंगाची चादर घेऊन झोपली होती. त्यामुळे लोकांना वाटले, की हा कोणाचातरी मृतदेह असावा. त्यामुळे लोकांची गर्दी जमा झाली. पण जेव्हा ती झोपलेली व्यक्ती उठली तेव्हा लोक घाबरून पळून गेले.

आयएएस अधिकारी अवनिश शरण यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती पांढऱ्या रंगाची प्लॅस्टिकची चादर घेऊन झोपली आहे. मात्र, लोकांनी पाहिल्यावर त्यांना हा मृतदेह असावा, अशी शंका आली. त्यामुळे त्याठिकाणी मोठी गर्दी झाली होती.

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, जेव्हा पोलिसांनी ती चादर बाहेर काढली तेव्हा एक व्यक्ती उठून उभी राहिली. त्या व्यक्तीला उठलेले पाहिल्यानंतर हे पाहणारे लोक घाबरून पळून गेले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत