वायरल झालं जी

लोकांना सामाजिक उपदेश देणारी माध्यमे सुधारणार कधी? सोशल मीडियावर संताप

मुंबई : स्वतःला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानणारी माध्यमे कधी सुधारणार असा संतापजनक प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. अनेकांनी हा संताप सोशल मीडियावर व्यक्त होत दाखवूनही दिला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे कव्हरेज करताना देशात बाकी कुठला प्रश्नच शिल्लक नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या पद्धतीने रिया चक्रवर्तीसोबत माध्यमे वागत आहेत. त्या प्रवृत्तीच्या विरोधात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळलेली दिसून येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या सोशल मीडियावर हे चित्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या चित्रामध्ये रियाच्या भोवताली अनेक माईक दिसत असून त्यांना घारीचे मुंडके जोडण्यात आलेले आहे. एकप्रकारे ते घारीप्रमाणे रियावर झडप घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे या चित्रातून प्रतित होते.

देशात दिवसाला एका लाखांच्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. देशातील अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. रोजगारांचा प्रश्न मोठा आहे. अनेक तरुणांच्या हाताला काम नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. गुन्ह्यांच्या घटनामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशातील आरोग्यव्यवस्था कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरती ढासळली आहे. अशा प्रकारची नाना संकटे असताना माध्यमे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला हवा देत आहेत. त्यासोबतच रिया चक्रवर्तीभोवती निर्माण केलेले वलय आणि अभिनेत्री कंगना रानावतला दिलेले महत्व लोकांना खटकत असून याबाबत नेटीझन्स सोशल मीडियावर थेट बोलताना दिसत आहेत.

योगेश चौरे या फेसबुक युजर त्याने केलेल्या कमेंटवर स्पष्टीकरण देताना ‘काडीची सुद्धा सहानभुती नाहीये मिडीयाबद्दल.. कधीच नव्हती. असे स्पष्ट म्हटले आहे. आता माझ मत हे आहे. “पांडुरंग रायकरसारखे अजुन पाच पन्नास पत्रकार कोरोनामुळे दगावले तर मला एक टक्का सुद्धा दुखः #कधीच होणार नाही” असेही स्पष्ट केले आहे.

"पांडुरंग रायकरसारखे अजुन पाच पन्नास पत्रकार कोरोनामुळे दगावले तर मला एक टक्का सुद्धा दुखः होणार नाही" अशी कमेंट मी एका…

Posted by Yogesh Choure on Monday, September 7, 2020

त्यासोबतच, अजित बायस या फेसबुक युजरने सुशांत प्रकरणात इलेक्ट्रॉनिक मीडियाने जो काही नंगानाच चालवलाय ते पत्रकार म्हणून घ्यायला लाज वाटायला लावणारं असल्याचे म्हटले आहे. सुशांत सिंह राजपूत या सगळ्या प्रकरणात रियाच्या वाट्याला जो काही मीडिया ट्रायल आलाय, तो दुश्मनाच्याही वाट्याला येऊ नये. असेही अजित बायस यांनी म्हटले आहे.

सुशांत प्रकरणात इलेक्ट्रॉनिक मीडियाने जो काही नंगानाच चालवलाय ते पत्रकार म्हणून घ्यायला लाज वाटायला लावणारं आहे. हे…

Posted by Ajit Bayas on Monday, September 7, 2020

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत