राग झाला अनावर तब्बल 500 दारुच्या बाटल्या फोडल्या; पाहा व्हिडीओ
वायरल झालं जी

राग झाला अनावर तब्बल 500 दारुच्या बाटल्या फोडल्या; पाहा व्हिडीओ

कधी कोणाला कोणत्या गोष्टीचा राग येईल आणि कोण रागाच्या भरात काय करेल याचा देखील काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एका महिलेला सुपरमार्केटमध्ये राग अनावर झाला आणि तीन चक्क एक दोन नाही तर 500 हून अधिक दारुच्या बाटल्या फोडल्याचा प्रकार समोर आला आहे.या व्हिडीओमध्ये आपल्याला असे दिसेल की, एका महिलेनं रागाच्या भरात सगळ्या बाटल्या फोडून टाकल्या आहेत. साधारण 500 च्या आसपास या बाटल्या फोडल्याची माहिती मिळाली आहे. या बाटल्यांची साधारण किंमत 130, 000 डॉलर्स असल्याचं सांगितलं जात आहे. भारतीय रुपयात विचार करायचा झाला तर 95 लाखांच्या आसपास ही किंमत आहे.

ही घटना इंग्लंडमधील अल्दी सुपरमार्केटमधील असल्याचं सांगितलं जात आहे. या महिलेनं या बाटल्या का फोडल्या याचं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.