योगी आदित्यनाथांनी दिली शिवी?; व्हिडीओ व्हायरल
वायरल झालं जी

योगी आदित्यनाथांनी दिली शिवी?; व्हिडीओ व्हायरल

लखनौ : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवी दिल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एएनआय वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलत असतानाच असून, चिडलेल्या आदित्यनाथ यांनी समोरील व्यक्तीला शिवी दिल्याचे दिसून येत आहे. समोरच्या व्यक्तीबद्दल अपशब्द वापरल्याने योगींवर टीकाही होत आहे. तर दुसरीकडे योगींना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

योगी आदित्यनाथ यांनी रविवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर ते एएनआयशी बोलत होते. प्रतिक्रिया देत असतानाच कॅमेरला हलल्याने योगी आदित्यनाथ चिडले आणि त्यांनी व्हिडीओ पत्रकाराला शिवी दिली.

मुंबई युवक काँग्रेसनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा आहे अजय बिश्त यांचा खरा चेहरा. एएनआयच्या पत्रकाराला कॅमेऱ्यासमोरच दिली शिवी. साधूच्या वेशात दिसणाऱ्या या तथाकथित योगींच्या डोक्यात भरलेली अमर्यादा, असंस्कृतता आणि खालच्या पातळीवरील शब्दाबद्दल भाजपाला भलेही अभिमान वाटेल, पण देश अपमानित झाला आहे, अशी टीका युवक काँग्रेसने केली आहे.

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो डिलीट करत सुधारित व्हिडीओ पोस्ट केला आहे. अगोदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या थेट प्रतिक्रियेचा व्हिडीओ मागे घेण्यात आला आहे. या व्हिडीओत योगी आदित्यनाथ कोरोना लसीकरणासंदर्भात माहिती देत आहेत, असं एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.