कौतुकास्पद! रिक्षाचालकाच्या मुलीला २१ व्या वर्षी ४१ लाखांचे पॅकेज
महिला विशेष

कौतुकास्पद! रिक्षाचालकाच्या मुलीला २१ व्या वर्षी ४१ लाखांचे पॅकेज

कोल्हापूर : कोल्हापूरमधील अमृता कारंडे या रिक्षाचालकाच्या मुलीला अमेरिकेतील एका कंपनीने ४१ लाख रुपयांचं पॅकेज दिलं आहे. २१ वर्षीय अमृता ही अजूनही कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी म्हणजेच केआयटीमध्ये सॉफ्टेवेअर इंजिनियरिंगच्या चौथ्या वर्षात शिकत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमृताला अॅडॉब या कंपनीने प्री प्लेसमेंट ऑफर लेटर दिलं आहे. अमृता ही कंपनीच्या नोएडा येथील कार्यालयामध्ये रुजू होणार आहे. अमृता ही मध्यमवर्गीय मराठी घरातील मुलगी असून तिचे वडील विजयकुमार हे रिक्षाचालक आहे तर आई गृहिणी आहे. मला शिक्षण घेता यावं म्हणून माझ्या पालकांनी फार कष्ट घेतले आहेत. मला त्यांच्या या कष्टानंतर त्यांना थोडा आनंद देता आला याचं समाधान आहे. मला भारतामधील माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये संशोधन करण्याची इच्छा आहे, असं अमृताने टाइम्सशी बोलताना सांगितलं आहे.

केआयटीचे अध्यक्ष सुनिल कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार अमृताने अॅडॉबने आयोजित केलेल्या सी कोडींगच्या स्पर्धेमध्ये पाहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर अमृताला कंपनीकडून अडीच महिन्यांच्या इंटर्नशीपची संधी देण्यात आली. यासाठी तिला कंपनीने स्कॉलरशीप स्वरुपात महिन्याला एक लाख रुपये दिले. या कालावधीमध्ये तिच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या ज्यात तिने अगदी उत्तम कामगिरी केल्याचं कुलकर्णी सांगतात. त्यानंतर तिला कंपनीने थेट ४१ लाखांची नोकरीची ऑफर दिली.