महिला विशेष

महिला अत्याचाराविरोधात महाराष्ट्रात ‘शक्ती कायदा’; बलात्कार प्रकरणात गुन्हेगाराला ४५ दिवसांत फाशीची शिक्षा

मुंबई : राज्यात महिला अत्याचार आणि बालगुन्हेगारीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ‘शक्ती कायदा’ येणार आहे. आंध्रप्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात हा कायदा लागू केला जाणार आहे. महिला अत्याचार प्रकरणात 21 दिवसात निकाल लागावा तसेच महिला व बाल अत्याचारांच्या घटनांमधील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा कायदा असणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शक्ती कायद्याचा मसुदा मंजुरीसाठी येण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सरकार कायदा आणण्याच्या तयारीत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, गेल्या वर्षभरात वर्धा हिंगणघाट जळीतकांड, नाशिक लासलगाव जळीतकांड, बीडमधील अॅसिड अटॅक प्रकरणासह अनेक घटनांनी महाराष्ट्र हादरुन गेला होता. या जुन्या घटनांना हा कायदा लागू होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आंध्रप्रदेशात दिशा कायदा लागू केल्यापासूनच महाराष्ट्रात देखील असा कायदा आणण्याबाबत हालचाली सुरु झाल्या होत्या. ‘दिशा’ कायद्याची माहिती घेण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आंध्र प्रदेशला गेले होते. तसेच कायद्यासाठी एक समिती देखील गठित केली होती. महाराष्ट्रात देखील महिला अत्याचारांच्या घटनांचे प्रमाण कमी नाही.

आंध्र प्रदेश राज्य सरकारने आणलेल्या ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर राज्य सरकार ‘शक्ती’ कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात आणत आहे. मात्र, ‘दिशा’ कायद्यामध्येही फाशीची शिक्षा सुनावण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी आहे. ‘शक्ती’ कायद्यात तो कमी करण्यात आला आहे. बलात्कारासारख्या अमानुष घटनांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत आरोपपत्र आणि ४५ दिवसांच्या आत गुन्हेगाराला फाशीच्या शिक्षेची तरतूद ‘शक्ती’ कायद्यामध्ये करण्यात आली आहे. याचबरोबर, सोशल मीडिया, मेल, मेसेज, इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमातून महिलांवर कमेंट करणे, धमकी देणे, चुकीची माहिती पसरवणे यासाठी पण शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

‘या’ आहेत शक्ती कायद्यातील मुख्य तरतूदी
सगळे गुन्हे अजामीनपात्र असतील
बलात्कार प्रकरणी अजामीनपात्र गुन्हा Rarest of rare प्रकरणात फाशी शिक्षा तरतूद, अथवा जन्मठेप आणि दंड
ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची तरतूद
वय वर्ष 16 पेक्षा कमी असलेल्या मुलींवर अत्याचार झाल्यास मरेपर्यंत जन्मठेप
सामूहिक बलात्कार – 20 वर्ष कठोर जमठेप शिक्षेची तरतूद किंवा मरेपर्यंत जन्मठेप 10 लाख रुपये दंड किंवा मृत्युदंड
अतिशय क्रूर महिला अत्याचार गुन्ह्याप्रकरणी मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद
16 वर्षाखालील मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी कठोर जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप दहा लाख रुपये दंड
बारा वर्षाखालील मुलीवर अत्याचार मरेपर्यंत कठोर जन्मठेप शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड
पुन्हा पुन्हा महिला अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेप शिक्षा
बलात्कार प्रकरणी तपसास सहकार्य न करणाऱ्या सरकारी सेवकाला दोन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड
अॅसिड अटॅक केल्यास किमान दहा वर्षांची किंवा मरे पर्यंत जन्मठेप शिक्षा, पीडित व्यक्तीला दंड रक्कम द्यावी लागणार
अॅसिड फेकण्याचा प्रयत्न केल्यास 10 ते चौदा वर्षांपर्यंत तुरुंगवास
अॅसिड हल्ला हा गुन्हा अजामीनपात्र
महिलेचा कोणत्या पद्धतीने छळ केल्यास किमान दोन वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड ,

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *