महिला विशेष

प्रेरणादायी! कुठलाही क्लास न लावता झाली आयएएस

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागलं की अनेकजण विशेष प्रयत्न करताना दिसतात. यासाठी विशेष कोचिंग क्लास लावले जातात. तरीही पहिल्याच फटक्यात यात यश मिळण्याची हमी नसते. अशा या अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या परीक्षेत कोणताही क्लास न लावता यशस्वी होण्याची किमया अनुकृती शर्मा करून दाखवली आहे. विशेष म्हणजे अनुकृतीनं लग्नानंतर ही परीक्षा दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अनुकृती शर्मा हिनं आपल्या कामगिरीनं लग्नानंतरही आयएएस ऑफिसरसारख्या अवघड क्षेत्रात करिअर घडवता येते, हे सिद्ध केलं आहे. यामुळं असंख्य महिलांना तिनं प्रेरणा दिली आहे. अनुकृति शर्मा हिनं लग्नानंतर यूपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मात्र या परीक्षेच्या तयारीसाठी तिनं कोणताही कोचिंग क्लास किंवा टेस्ट सिरीज दिली नाही. अर्थात यामुळे तिचा हा प्रवास थोडा दीर्घकाळाचा होता; पण धीर न सोडता तिनं प्रयत्न सुरूच ठेवले आणि अखेर आपलं उद्दिष्ट्य गाठलं आहे.

कोणताही क्लास न लावता अनुकृतीनं आपला अभ्यास कसा केला याबद्दल सर्वांनाच कुतूहल आहे. त्याबाबत सांगताना ती म्हणाली की, तिने ऑनलाइन माध्यमातून या परीक्षेचा अभ्यास केला. कोणत्याही विषयावर काही वाचायचे असेल तर ती इंटरनेटची मदत घेत असे. इंटरनेटवर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीनं आपण सर्व विषयांची तयारी करू शकता असा तिचा विश्वास आहे. त्यामुळं तिनं स्व-अभ्यासाच्या बळावरच ही परीक्षा दिली.

अनुकृति शर्मा 2019 मध्ये 138वा क्रमांक मिळवून युपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. पण, त्याआधी 2017 मध्येही तिनं या परीक्षेचे तीन टप्पे पार करून 355वा क्रमांक मिळवला होता. मात्र अधिक वरचा क्रमांक मिळवण्याच्या उद्देशानं तिनं पुन्हा परीक्षा द्यायची ठरवली. पण ती लगेच 2018 मध्ये न देता एक वर्षाचा ब्रेक घेऊन तिनं ती 2019 मध्ये दिली. या वर्षाच्या काळात तिनं आणखी कसून तयारी केली आणि पुढच्या क्रमांकानं तिनं परीक्षा उत्तीर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published.