विखे-पाटील येतो म्हणाले पण गेलेच नाहीत, उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली; धनगर आंदोलक संतप्त
राजकारण

विखे-पाटील येतो म्हणाले पण गेलेच नाहीत, उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली; धनगर आंदोलक संतप्त

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील मनोज जरांगे यांचे उपोषण सुटले, याच मागणीसाठीचे नगरमधील नाभिक समाजाचेही उपोषण सुटले. त्यानंतर आज चौंडीतील धनगर समाजाचे उपोषणही मिटण्याची चिन्हे होती. यासाठी नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मध्यस्थी करण्यासाठी चौंडीला जाणार होते. त्यांचा दौराही ठरला होता. धनगर समाजातील अनेकांचा राग असूनही विखे पाटील आंदोलनस्थळी जाणार म्हणून याला महत्व प्राप्त झाले होते. […]