बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीचे दुप्पट वयाच्या पुरुषासोबत लग्न लावून…

नगर : नगर जिल्ह्यात अमानुषतेचा कळस गाठणारी घटना समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. येथील एका 13 वर्षीय मुलीचा 24 वर्षीय तरुणासोबत जबरदस्तीने विवाह लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढंच नव्हे तर नवऱ्या मुलानं पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवत तिला जिवंतपणी नरक यातना दिल्या आहेत. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईसह आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला […]

बातमी महाराष्ट्र

राज्यभरात पुढील २ दिवस जोरदार पावसाची शक्यता; पुण्यात हाय अलर्ट

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकणार आहे. त्यामुळे उद्यापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. आज राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण, खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील २४ तासांत पालघर […]

बातमी महाराष्ट्र

राज्यातील ३१ आयपीएस अधिकाऱ्यांसह ५४ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

मुंबई : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. आज अखेर राज्यातील ३१ आयपीएस अधिकाऱ्यांसह ५४ पोलीस उपायुक्त/अपर अधीक्षक यांच्या सह ९२ साहाय्यक पोलिस आयुक्त उपाध्यक्ष यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ६ सहाय्यक पोलीस अधीक्षक यांना उपायुक्त पदावर पदोन्नती मिळाली आहे. आयपीएस अधिकाऱ्यांचे नाव आणि बदलीचं ठिकाण श्रीमती मोक्षदा अनिल पाटील ( पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, औरंगाबाद) […]

बातमी महाराष्ट्र

एसटीला मोठा दिलासा! महामंडळाकडे ५०० कोटी वितरित

मुंबई : कोरोनामुळे एसटी महामंडळाला वर्षभरापासून आर्थिक चिंता सतावत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर त्याचा मोठा परिणाम होत होता. तारीख उलटूनही वेतन हाती आलं नसल्याने घरखर्च भागवण्याची मोठी समस्या कर्मचाऱ्यांसमोर होती. त्यामुळे वेतनासाठी एसटी महामंडळाने ६०० कोटी रुपयांची मदत राज्य शासनाकडे मागितली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर एसटी महामंडळाला ५०० कोटी तातडीने वितरित करण्यात […]

बातमी महाराष्ट्र

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांना 6 कोटींचा गंडा

नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या आखत्यारीतील साखर कारखान्याला एका कंपनीने 6 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेडमधील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट ३ आणि ४ ने साखर विक्रीचे टेंडर तामिळनाडूतील चेन्नई येथील एका कंपनीला दिले होते. या कंपनीने साखर कारखान्याची फसवणूक केली आहे. साखर निर्यातीवर केंद्राकडून काही […]

बातमी महाराष्ट्र

आगीच्या घटनांसाठी आता रुग्णालय प्रशासन जबाबदार

मुंबई : कोरोना काळात राज्यभरात विविध ठिकाणी रुग्णालयांत आग लागण्याच्या अनेक दुर्घटना घडल्या. यांमध्ये अनेकांचा जीव देखील गमवावा लागेल. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, त्यानुसार या पुढील काळात अशा प्रकराच्या दुर्घटनांची जबाबदारी आता संबंधित रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक देखील जारी केले आहे. […]

बातमी महाराष्ट्र

नाटककार, लेखक जयंत पवार काळाच्या पडद्याआड

मुंबई : नाटककार, लेखक, संवेदनशील विचारवंत जयंत पवार यांचे रविवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी लेखिका-पत्रकार संध्या नरे आणि मुलगी असा परिवार आहे. जयंत पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी बोरिवली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जयंत […]

बातमी महाराष्ट्र

पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊसाचा इशारा

मुंबई : राज्यात उद्यापासून चार दिवस मुसळधार पाऊसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात ३० ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार असून परभणी, नाशिक, ठाणे, रायगडसह पालघर जिल्ह्यात ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात तयार होण्याऱ्या कमी दाबाचे क्षेत्र, त्याचा पश्चिम व मध्य भारतातून प्रवासाची शक्यतेमुळे […]

बातमी महाराष्ट्र

अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; अशी तपासा यादी

पुणे : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर झाली आहे. अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागातील तब्बल 3 लाख 20 हजार 710 जागांसाठी 2 लाख 37 हजार 383 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. यातील अवघ्या 2 लाख 2 हजार 58 विद्यार्थ्यांनी कॉलेज पसंतीचे पर्याय भरले होते. शिक्षण संचालनालयाकडून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर […]

बातमी महाराष्ट्र

राष्ट्रवादीला आणखी एक झटका; प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात हजर

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. सीजे हाऊस प्रकरणात ही चौकशी होत आहे. यापुर्वी ईडीने २०१९मध्ये प्रफुल्ल पटेल यांची तब्बल १२ तास कसून चौकशी केली होती. याच प्रकरणात ईडी पुन्हा चौकशी करत असल्याचे बोलले जात आहे. २०१९ मध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा सहकारी इक्बाल मिर्ची […]