बातमी विदेश

जपानचे नवे पंतप्रधान फुमियो किशिदा; योशीहिदे सुगा यांची घेतली जागा

टोकियो : जपानचे मुत्सद्दी राजकारणी फुमियो किशिदा जापानचे नवे पंतप्रधान बनणार आहेत. किशिदा यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेतेपदाची निवडणूक जिंकली आहे. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, किशिदा निवडणूक जिंकताच देशाच्या पुढील पंतप्रधान होण्यास तयार आहेत. किशिदा जपानचे माजी परराष्ट्र मंत्री आहेत आणि त्यांनी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे प्रमुख, पंतप्रधान योशीहिदे सुगा यांची जागा घेतली आहे. सुगा एका […]

बातमी विदेश

चीनमध्ये झाली लोकसंख्येत घट; सरकारने घेतला मोठा निर्णय!

नवी दिल्ली : चीनची एक मोठी चिंता म्हणजे देशात तरुणांची घटती संख्या आहे. यासाठी त्यांनी मे महिन्यात आपल्या धोरणात मोठा बदल केला. या बदललेल्या धोरणाअंतर्गत चीनमधील जोडप्यांवर आता तीन मुलांना जन्म देण्यासाठी विविध प्रकारे दबाव आणला जात आहे. या धोरणांतर्गत, चीनच्या स्थानिक सरकारने तिसरे अपत्य असलेल्या जोडप्यांना रोख रक्कम तसेच इतर सुविधा देणे सुरू केले […]

बातमी विदेश

मोठी बातमी! भारताबाबत फोर्ड कंपनीचा महत्वाचा निर्णय

न्यूयॉर्क : अमेरिकेतील मोटार वाहने बनवणारी महत्वाची कंपनी फोर्ड मोटारने भारताबाबत मोठा निर्णय घेतला आहे. भारतात सुरु असलेले दोन्ही कारखाने बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. भारतात गेल्या काही दिवसात फोर्ड वाहनांच्या विक्रीत घट झाली आहे. त्याचबरोबर कंपनीने वाहनांचं नवं मॉडेलदेखील लाँच केलेलं नाही. त्यामुळे दोन्ही कारखाने तोट्यात असल्याचं कारण सूत्रांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलं […]

बातमी विदेश

मॉक ड्रीलदरम्यान कॅमेरामनला वाचवण्याच्या नादात मंत्र्यांचा मृत्यू

नवी दिल्ली : मॉक ड्रीलदरम्यान कॅमेरामनला वाचवण्याच्या प्रयत्नात एका रशियन मंत्र्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रशियाचे आपत्कालीन मंत्री येवगेनी झिनिचेव यांचं बुधवारी आर्क्टिक प्रदेशातल्या आपत्कालीन प्रशिक्षणादरम्यान (मॉक ड्रील) निधन झालं आहे. आरआयए या वृत्तसंस्थेने रशियन आपत्कालीन मंत्रालयाच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. झिनिचेव हे ५५ वर्षांचे होते. २०१८ पासून झिनिचेव यांनी हाय-प्रोफाइल आपत्कालीन […]

बातमी विदेश

अमेरिकेत इडा चक्रिवादळाचा हाहाकार; ४४ जणांचा मृत्यू

न्यूयॉर्क : अमेरिकेत इडा चक्रिवादळाने हाहाकार माजवला असून गुरुवारी एका रात्रीत एकट्या न्यूयॉर्कमध्ये तब्बल ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण हे स्वतःच्याच तळघरात कैद झाले होते आणि तिथेच पुरामुळे त्यांचा मृत्यू झाला. वादळामुळे अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये विक्रमी पाऊस झाला आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं असून सर्वत्र पाणी साचल्याने सबवे सेवा बंद झाली आहे. न्यूयॉर्कमधील […]

बातमी विदेश

अमेरिकेच्या माघारीनंतर काबूल विमानतळावर तालिबानचा ताबा

काबूल : काबूलमधून अमेरिकेने सैन्य माघारी घेतल्यानंतर मंगळवारी काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाचा तालिबानने ताबा घेतला. अमेरिकेचे शेवटचे विमान धावपट्टीवरून उडाल्यानंतर तालिबानने विमानतळ ताब्यात घेतले. असे असले तरी काही अफगाणी लोक अजूनही परदेशात जाण्याच्या विचारात आहेत. हमीद करजाई विमानतळावर एकच धावपट्टी असून विमानतळाच्या लष्करी भागाकडे काही वाहने उभी होती. तालिबानी नेत्यांनी सांगितले की, आमच्या माजी विरोधकांना आम्ही […]

बातमी विदेश

काबुल पुन्हा हादरलं! विमानतळाजवळ रॉकेट हल्ला

काबुल : अफगाणीस्तानची राजधानी काबुल पुन्हा हादरली आहे. काबुलच्या विमानतळ परिसरात पुन्हा रॉकेट हल्ला झाला आहे. यामध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात तीनजण गंभीर जखमी झाल्याची माहिती असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकून पडलेल्या परदेशी नागरिकांचं रेस्क्यु ऑपरेशन सुरु असताना झालेल्या या हल्ल्यामुळे काबुलमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काबुलमधील […]

बातमी विदेश

अमेरिकेने केला काबूलच्या हल्लेखोरांचा खात्मा

नवी दिल्ली : अमेरिकेने काबूलच्या हल्लेखोरांचा खात्मा केला आहे. शनिवारी पहाटे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनांच्या तळांवर ड्रोनने बॉम्ब हल्ले केले. काबूलमधील हल्लेखोरांना धडा शिकवू असं अमेरिकने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते. अवघ्या ४८ तासांमध्ये अमेरिकेने काबूल विमानतळावर हल्ला केल्यानंतर जबाबदारी स्वीकारणाऱ्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या तळांवर बॉम्ब हल्ले केले. यासंदर्भातील […]

बातमी विदेश

काबूल विमानतळावर मोठा स्फोट; अनेकजण मृत्यूमुखी

काबूल : अफगाणिस्तानात तालिबाननं सत्ता प्रस्थापित केल्यानंतर दहशतीचं वातावरण कायम आहे. अशात अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाबाहेर दोन आत्मघातकी हल्ले झाले आहेत. या हल्ल्याची खात्री पेंटागन प्रवक्त्यांनी केली आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार दोन हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. त्याचबरोबर तीन अमेरिकन सैनिकांसह १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि […]

बातमी विदेश

अफगाणिस्तानच्या मंत्र्याचे हाल; करावे लागतेय डिलिव्हरी बॉयचं काम

काबूल : अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांच्यासह मंत्र्यांनी पळ काढला. तालिबानच्या कामाची पद्धत माहिती असल्याने मृत्यूदंडाशिवाय दुसरी शिक्षा नाही, अशी भीती राष्ट्रपतींसह मंत्र्यांना होती. मात्र अफगाणिस्तानातून इतर देशात गेल्यानंतर अनेकांना रोजीरोटीचा प्रश्न भेडसावू लागला आहे. दुसऱ्या देशात गेल्यानंतर तिथलं राहणीमान आणि पद्धत शिकून घेताना नागरिकांना अडचणी येत आहेत. अशात एका […]