जी-२० परिषदेंतर्गत नागपूर येथे नागरीसंस्थाची सी-20 परिषद आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेला विविध देशांमधील नागरी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. परिषदेच्या निमित्ताने नागरी समुहाच्या उत्थासाठी विविध विषयांसह औद्योगीक गुंतवणूक व विकासाच्या संधीवर देखील विचारमंथन होणार आहे. नागपुरात होणारी ही परिषद विदर्भाच्यादृष्टीने महत्वपूर्ण आहे. येथील कृषी, मत्सव्यवसाय, खनिज संपत्ती, वस्रोद्योग, वनसंपदा व पर्यटनआदी क्षेत्रात उद्योगाच्यादृष्टीने […]
Author: Jaipal Gaikwad
नव्या- जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. ही समिती तीन महिन्यात आपला आपला अहवाल सादर करणार आहे. या समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार, के.पी. बक्षी, सुधीरकुमार श्रीवास्तव यांचा समावेश असेल. तसेच लेखा […]
महिलांना मिळणार १ रुपयात सॅनिटरी पॅडस्; ‘जन औषधी सुगम’ ॲपच्या माध्यमातून मिळेल औषधांची माहिती
प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना (PMBJP) औषधे, रसायन आणि खते मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार जेनेरिक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे देशभर उघडण्यात आली आहेत. आतापर्यंत देशभरात ९१७७ हून अधिक जन औषधी केंद्रे उघडली गेली आहेत, जी देशातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील […]
ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबोट यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट
मुंबई :- ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबोट यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी हे उपस्थित होते. ऑस्ट्रेलियातील उद्योग क्षेत्रातील शिष्टमंडळही यावेळी उपस्थित होते. यावेळी अर्थ, उद्योग, कौशल्य विकास या क्षेत्रातील सहकार्यासंदर्भात चर्चा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विविध क्षेत्रात एकत्रितपणे काम […]
आम्हाला औरंगजेबासोबत काही देणं घेणं नाही; ‘औरंगजेब आमच्यावर का लादता?’, इम्तियाज जलील यांचा सवाल
खासदार इम्तियाज जलील यांचं गेल्या तीन दिवसांपासून साखळी आंदोलन सुरु आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतराला त्यांचा विरोध आहे. त्यासाठीच त्यांचं आंदोलन सुरु आहे. इम्तियाज जलील यांच्या आंदोलनात औरंगजेबाचा फोटो झळकवण्यात आलेला. त्यावरुन वाद निर्माण झालाय. पण जलील यांनी संबंधित प्रकाराचं समर्थन केलेलं नाही. त्यांनी संबंधित प्रकारावर आपली भूमिका मांडली. भाजप आणि शिवसेनेकडून जलील यांच्यावर टीका केली […]
IPLमध्ये लागू होणार नवा क्रांतीकारी निर्णय; निर्णायक क्षणी बदलणार मॅचचा निकाल
मुंबई: महिला प्रीमियर लीगमध्ये महिला क्रिकेटपटूंनी आपल्या खेळाने एकच दबदबा निर्माण केला आहे. महिला प्रीमियर लीगचा वाढता रोमांच पाहून सर्वांनाच आता आयपीएलच्या १६ व्या सीझनचे वेध लागले आहेत. ही लीग चाहत्यांसाठी आणि क्रिकेटपटूंसाठी नेहमीच काहीतरी खास आणि नवीन आणते, ज्यामुळे लोकांना सामन्याचा अधिक आनंद लुटता येतो. आयपीएलच्या नव्या सीझनमध्ये रिव्ह्यू घेण्याची पद्धतही बदलणार आहे. एका […]
बायकोला मारलं, मग तुकडे करुन पाण्याच्या टाकित लपवलं, दोन महिन्यांनी भयंकर गुन्ह्याची उकल…
बिलासपूर: छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये एका तरुणाने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतक्यावरत तो थांबला नाही तर त्याने मृतदेहाचे अनेक तुकडे करून पाण्याच्या टाकीत टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने हा मृतदेह तब्बल दोन महिने पाण्याच्या टाकीत लपवून ठेवला होता आणि कोणाला याची कल्पनाही नाही. बिलासपूरच्या उसलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. […]
इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही – राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण
मुंबई – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत दि.०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली आहे. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, यामुळे इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव […]
महामार्ग, जोड रस्ते, पुलांच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, : ठाणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करतानाच महामार्ग, जोड रस्ते, पूल यांच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. राष्ट्रीय महामार्ग, मेट्रो, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक पोलिस, महानगरपालिका बांधकाम या विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयातून ही काम पूर्ण करावी. या कामांसंदर्भात समन्वयासाठी जिल्हाधिकारी ठाणे यांनी नोडल अधिकारी म्हणून काम पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]
धम्मज्योती गजभिये यांनी मॅटमधील याचिका मागे घेतल्याने ‘सुनील वारे’ यांच्या बार्टी महासंचालक पदाचा मार्ग मोकळा
मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था पुणे (बार्टी) येथे महासंचालक पदावर नियुक्त होण्यासाठी पुन्हा एकदा सुनील वारे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याविरोधात मॅटमध्ये दाखल करण्यात आलेली याचिका आज मागे घेण्यात आली आहे. सुनील वारे यांची मागील महिन्यात बार्टीच्या महासंचालक पदावर प्रतीनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्या नियुक्तीविरोधात विद्यमान महासंचालक धम्मज्योती […]