राजकारण

ताटाखालचे मांजर न झाल्यामुळेच असे केले; काँग्रेस राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर

पुणे : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड हे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालील मांजर न झाल्यामुळेच त्यांची बदली करण्यात आल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनी केला आहे. पुण्याच्या महापालिका आयुक्त पदावरून शेखर गायकवाड यांना काढण्यात आल्यावरून पुण्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. काही सत्ताधाऱ्यांना महापालिका आयुक्त हे ताटाखालचे मांजर असावे, असे वाटते. […]

राजकारण

भाजपमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना काय मिळणार?

जयपूर : मध्यप्रदेशमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस सरकार उलथवून लावण्यात भारतीय जनता पक्षाला यश आलं, अगदी त्याच पद्धतीने राजस्थानमध्येही भाजपकडून चप्रयत्न केले जात असल्याचे बोलले जात आहे. तीन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशची सत्ता गमावलेल्या काँग्रेससाठी ही चिंतेची बाब असली तरी जे सचिन पायलट भाजपमध्ये जाऊन काँग्रेसची सत्ता पलटवणार त्यांना काँग्रेसमध्ये काय मिळणार हा खरा प्रश्न आहे. सचिन […]

राजकारण

ऐश्वर्या आणि आराध्यालाही कोरोनाची लागण झाल्याचं ट्विट महाविकास आघाडीच्या मंत्र्याने केलं अन्…

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन या दोघींनाही कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आले. सध्या सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट केल्यानंतर त्यांना ट्रोलही करण्यात आले आहे. तसेच, टोपे यांनी काही वेळातच ते ट्विट […]

राजकारण

मध्यप्रदेशची पुनरावृत्ती होणार? सचिन पायलटांनी सांगितला फुटणाऱ्या आमदारांचा आकडा

जयपूर : राजस्थानमध्ये मध्यप्रदेशची पुनरावृत्ती होणार असल्याचे बोलले जात असून अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस सरकार कोसळणार असल्याचे बोलले जात आहे. अशोक गेहलोत यांच्यासोबत राजकीय मतभेद शिगेला गेल्यानंतर काल (११ जुलै) रात्रीपासून २२ आमदारांसह दिल्लीत गेलेले राजस्थानचे उपमुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते सचिन पायलट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती एनडीटीव्ही इंडियाने दिली आहे. आपल्याकडे पक्षातील […]

राजकारण

आणखी दोन महिन्यांसाठी सवलतीच्या दराने मिळणार अन्नधान्य; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे ९ निर्णय

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण ०९ निर्णय घेण्यात आले. महत्वाचं म्हणजे आणखी दोन महिने एपील केशरी धारकांना स्वस्त दराने धान्य मिळणार आहे. तसेच आणखी तीन महिने शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांवरुन ५ रुपयांवर करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांसाठी शिवभोजन थाळी अवघ्या ५ […]