बातमी मुंबई

एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना अटक; काय आहे प्रकरण?

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएनं गुरुवारी सकाळीच एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी छापा टाकला होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटकांचं प्रकरण आणि त्यानंतर घडलेलं मनसुख हिरेन हत्या प्रकरण याची चौकशी एनआयएकडून सुरू आहे. यासंदर्भात एनआयएनं प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकला होता. […]

बातमी मुंबई

मालाडमध्ये मोठी दुर्घटना; इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

मुंबई : मालाडमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मालाड पश्चिमेला असणाऱ्या न्यू कलेक्टर कंपाऊंड येथे ही दुर्घटना घडली आहे. चार मजली इमारत शेजारच्या घरांवर कोसळली. यानंतर आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली असून मृतांच्या संख्या वाढण्याची भीती आहे. मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी […]

बातमी मुंबई

धक्कादायक! पालघरमध्ये ६ दिवसाच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू

पालघर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी धोका मात्र कायम आहे. अशात पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा दिवसीय कोरोनाबाधित बाळाला वेळेवर उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागले आहेत. इतकंच नाही तर यासाठी बाळाच्या आई-वडील आणि नातेवाईकांना तीन रुग्णालयाचे उंबरठे झिजवावे लागले. या घटनेनंतर नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. […]

बातमी मुंबई

महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीवर रात्रीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी गँगरेप

मुंबई : महाराष्ट्र हादरवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रावर भेटलेल्या एका अल्पवयीन मुलीवर मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. इन्स्टावरील मित्रांनी वाढदिवसांच्या निमित्ताने बोलावून घेतलं आणि सहा जणांनी तिच्यावर मुंबईतील तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. ३१ मे आणि १ जूनच्या रात्रीत ही घटना […]

बातमी मुंबई

ब्रेकिंग! मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन; तपास सुरु

मुंबई : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आली आहे. त्यानंतर मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झाले आहे. मंत्रालयातील कंट्रोल रूमला बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. निनावी धमकीचा फोन आल्यानंतर मंत्रालयातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून कथित बॉम्बचा तपास सुरु आहे. साधारण एक तासाभरापूर्वी धमकीचा निनावी फोन मंत्रालयाला आला होता. […]

बातमी मुंबई

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या बंगल्यावर ईडीचा छापा

लोणावळा : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या रडारवर असून, त्यांच्या लोणावळा येथील बंगल्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. ईडीचे अधिकारी सरनाईक यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत, अशी अधिकृत माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. टॉप्स ग्रुप(सिक्युरीटी) कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत ईडीकडून चौकशी केली जात आहे. ईडीने नोव्हेंबर २०२०मध्ये बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक […]

बातमी मुंबई

बॉम्बे हायजवळ बुडालं ओएनजीसीचं जहाज; १४७ जणांना वाचवण्यात यश

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने बॉम्ब हायजवळच्या परिसरात ओएनजीसीचं पी ३०५ (पापा-३०५) मोठं जहाज बुडाल्याची घटना घडली. रविवारी सायंकाळी जहाजावरून एसओपी संदेश मिळाल्यानंतर नौदलाने मदत व बचावकार्य हाती घेतलं होतं. जहाजावर २६० लोक होते, त्यापैकी १४७ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं असून, इतरांचा शोध घेतला जात आहे. नौदल आणि ओएनजीसीच्या प्रवक्त्यांनी ही माहिती […]

बातमी मुंबई

मुंबईत पेट्रोल दरात मोठी वाढ; काय आहेत आजचे दर

मुंबई : कोरोनामुळे नागरिक संकटात असताना दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. काल पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर पाहायला मिळाले. मात्र एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा दरवाढ सुरू झाली आहे. मे महिन्यात एकूण आठ दिवस इंधनाचे दर वाढले आहेत. गेले दोन महिने इंधनाचे दर स्थिर […]

बातमी मुंबई

सचिन वाझेबाबत मुंबई पोलीस दलाचा मोठा निर्णय

मुंबई : सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझेबाबत मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता पोलीस दलातून त्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना अटक करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून हा तपास सुरु होता. २५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पियो कार आढळून आली होती. तर या गाडीचे […]

बातमी मुंबई

विरार येथे रुग्णालयाला आग लागून १३ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

विरार : नाशिक दुर्घटनेत २४ रुग्णांना आपले प्राण गमावल्यानंतर विरारमध्ये एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली. यामध्ये १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी अतिदक्षता विभागात १७ कोरोनाबाधित रुग्ण […]