कोरोनाची लाट संपली आहे आणि आता “H3N2” व्हायरस वाढत आहे. केरळ आणि हरियाणामध्ये दोन मृत्यू झाल्याने केंद्राने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याची शिफारस केली जाते. फेडरल डिपार्टमेंट ऑफ हेल्थने इन्फ्लूएंझा सारख्या आजाराबद्दल राज्ये आणि कॉमनवेल्थ प्रदेशांना पत्र लिहिले आहे. या पत्रात H1N1 आणि H3N2 सारख्या गंभीर तीव्र श्वसन रोगांसाठी मार्गदर्शक तत्त्वांचे […]
कोरोना इम्पॅक्ट
पुन्हा कोरोनाचा कहर; ‘या’ शहरात लॉकडाऊन, प्रवासी निर्बंध
चीनमध्ये कोरोना व्हायरसचा पुन्हा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे. याठिकाणी अचानक कोरोना बाधितांची संख्या वाढू लागलीय. एवढंच नाही तर बाधितांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झालीय. या पार्श्वभूमीवर चीन सरकारनं अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन केलं आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये (China Covid Cases) मोठी वाढ झालीय. बुधवारी कोविड प्रकरणं 31,454 च्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहेत. महामारीच्या सुरुवातीपासूनची […]
चौथ्या लाटेत करोनाची रूग्णसंख्या कमी पण मृत्यूचे प्रमाण भयंकर, ‘ही’ 8 विचित्र लक्षणे दीर्घकाळ घालत आहेत धुमाकूळ
कोरोना व्हायरसने (Coronavirus pandemic) पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण केले आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 18,930 नवीन रुग्ण आढळले असून 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 4.32% च्या डेली पॉझिटिव्ह रेट सोबतच एकूण अॅक्टिव्ह प्रकरणांची संख्या वाढून 1,19,457 झाली आहे. याकडे कोरोनाची चौथी लाट (covid19 4th wave) म्हणून पाहिले जात आहे. […]
आमिक्रॉनचे संकट वाढतेय; पण करोनाकडेही दुर्लक्ष नको, पाहा ताजी स्थिती!
मुंबई: राज्यात आज रविवारी करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ झाली असली तरी आजच्या मृत्यूसंख्येत घट पाहायला मिळत आहे. तसेच, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही आज वाढल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. आज राज्यात एकूण ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ७६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज ९०२ नव्या करोना रुग्णांचे निदान […]
Good News! महाराष्ट्रातला ‘हा’ जिल्हा सगळ्यात सुरक्षित, करोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाणही कमी
हिंगोली : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यापैकी हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी कोरोणा रुग्णाचे मृत्यु झाले आहेत, तसेच लागण कमी होण्याच्या हिंगोलीचाच क्रमांक लागतो. सद्या अक्टीव असलेल्या रुग्णांची संख्या सुद्धा हिंगोली तळाशी आहे. आज घडीला केवळ पाच रुग्ण या जिल्ह्यात उपचार घेत आहेत. मराठवाड्यात करोनाचा पहिला रुग्ण हा २३ मार्च २०२० रोजी औरंगाबाद आढळला होता, मग इतर जिल्हा […]
‘या’ लशीचे तीन डोस आणि ‘ओमिक्रॉन’चाही खात्मा!
गेली जवळपास दोन वर्ष जगभरात करोनानं धुमाकूळ घालणाऱ्या करोनाला संपूर्णत: मात देण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. मात्र, याच दरम्यान सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या करोना विषाणूच्या ‘ओमिक्रॉन’ स्वरुपानं आणखीनच खळबळ उडवून दिली. सर्वप्रथम ‘ओमिक्रॉन’विरुद्ध वापरात असलेल्या करोना लशींचा फायदा होणार का? कितपत होणार? कोणत्या लशी ओमिक्रॉनविरुद्ध सर्वात शक्तीशाली ठरतील? असे अनेक प्रश्न उपस्थित […]
भारतात तिसरी लाट येणार का? omicron च्या धोक्यावर who च्या अधिकाऱ्याने दिले उत्तर
नवी दिल्ली : देशात करोनाचा नवीन वेरियंट ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्य दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाचा नवीन वेरियंट ओमिक्रॉन हा अत्यंत संसर्गजन्य आहे. हा वेरियंट आतापर्यंत जगातील ५९ देशांमध्ये पसरला आहे. ओमिक्रॉनमुळे भारतात तिसरी लाट तर येणा नाही ना? अशी चिंता आता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशिया विभागीय संचालक डॉक्टर पूनम खेत्रपाल […]
लसीचा दुसरा डोस घ्यावाच लागणार, नाहीतर…
पुणे जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीचा (Covid Vaccination) पहिला डोस शंभर टक्के देण्यात आला असला तरी नागरिकांनी दुसरा डोसही लवकरात लवकर घ्यायला हवा. त्यासाठी प्रशासनानं तयारी केली आहे, पण नागरिकांनी सहकार्य न केल्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील,’ असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दिला. अजित पवार यांच्या उपस्थितीत आज जिल्हा वार्षिक समिती, जिल्हा […]
ओमिक्रॉनचे सावट असतानाच करोना रुग्णसंख्येत वाढ; केंद्राचा ६ राज्यांना अलर्ट
नवी दिल्ली: देशातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या तीनवर पोहचली असतानाच काही राज्यांत कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. ही बाब गांभीर्याने घेत केंद्र सरकारने तातडीने या राज्यांना पत्र पाठवलं असून त्यात महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आतापर्यंत ३८ देशांत ओमिक्रॉनने पाय पसरले असून भारतात […]
मोठी बातमी: ओमिक्रॉनने भारतात शिरकाव केलाच; ‘या’ राज्यात आढळले दोन रुग्ण
नवी दिल्ली: ओमिक्रॉन व्हेरिएंटला रोखण्यासाठी भारत सरकारने युद्धपातळीवर पावले टाकत आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांबाबत कठोर धोरण राबवले. मात्र, त्यानंतरही ओमिक्रॉनने भारतात शिरकाव केला असून ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आज आढळून आले आहेत. हे दोन्ही रुग्ण कर्नाटकमध्ये आढळले असून याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. ओमिक्रॉन व्हेरीएंटने बाधित असलेले दोन्ही रुग्ण हे भारतीय असून ते कर्नाटकातले […]