पुणे : अनलॉकनंतर रेस्तराँ पुन्हा सुरू झालेत, पण ग्राहकांचा अद्यापही हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने पुण्याच्या एका रेस्तराँ मालकाने भन्नाट शक्कल लढवलीये. हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पुण्यातील एका रेस्टॉरंटने चक्क बुलेटची ऑफर दिली आहे. विराट ‘बुलेट थाळी’ एका तासात संपवा आणि बुलेट बाईक जिंका अशी ऑफर वडगाव मावळमधील शिवराज हॉटेलने दिली आहे. या हॉटेलमध्ये मिळणारी […]
पुणे
पुण्यात पहिली लस 74 वर्षीय डॉ. विनोद शहा यांना; लसीकरणानंतर शहा म्हणाले…
पुणे : “माझ्यासह अनेक जण लसीच्या प्रतिक्षेत होतो. आज अखेर ती प्रतीक्षा संपली असून आज मी लस घेतल्याने मला प्रचंड आनंद झाला आहे.” अशा शब्दात पुण्यातील 74 वर्षीय डॉ विनोद शहा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आजपासून देशभरात कोरोना लसीकरण मोर्हिमेला सुरवात झाली. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तर तर मुंबईत मुख्यमंत्री उद्धव […]
रूग्णालयांना नियमांची गरज असून मेडिकल असोसिएशनची मागणी रास्त : गोपाळदादा तिवारी
पुणे : जन-आरोग्याची जबाबदारी विमा कंपन्या व खाजगी रूग्णालयांवर ढकलणाऱ्या भाजप नेत्यांना, सार्वजनिक आरोग्य सुविधा व सरकारी रूग्णालये यांवर बोलण्याचा नैतिक अधीकारच नसल्याचे मत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केले आहे. खाजगी रूग्णालयां प्रमाणेच सरकारी रूग्णालयांनाही नियमांच्या बंधनाची गरज असून महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनची मागणी रास्तच आहे, महाविकास आघाडी सरकारने त्याच्या पुर्ततेसाठी तातडीने पावले […]
पुणेकरांसाठी मोठी बातमी : जिल्ह्यातील किल्ले, स्मारके, संग्रहालये होणार खुली
पुणे : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी असून जिल्हयातील सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन खुली करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये दि. ३१ मार्च २०२० पासून बंद आहेत. पुणे जिल्ह्यास विविध ऐतिहासिक वास्तुचा वारसा लाभलेला आहे. […]
वाढत्या शहरीकरणासोबत नवीन पोलीस ठाण्यांनाही मंजुरी; तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला दोन कोटींचा निधी
पुणे : पुणे शहरात नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांसह वाढते शहरीकरण लक्षात घेऊन पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील पोलीस ठाण्यांच्या विभाजनाला मान्यता देण्यात आली. तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने पुणे जिल्ह्यातील वाघोली, ऊरळीकांचन, बाणेर, काळेपडळ, खराडी, फुरसुंगी, म्हाळुंगे, रावेत आणि शिरगाव या नवीन पोलीस ठाण्यांना मंजूरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात […]
औरंगाबादचे नाहीतर पुण्याचे नाव बदला; आंबेडकरांनी दिला इतिहासाचा दाखला
पुणे : औरंगाबाद नाहीतर पुणे शहराचे नाव बदलून संभाजीनगर करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. भाजपाकडून नामकरणाच्या मुद्द्यावर जोर दिला जात आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून नामांतराला विरोध होत आहे. त्यामुळे शहराच्या नामकरणावरून विरोधकांकडून शिवसेनेला लक्ष्य केलं जात असल्याचं चित्र आहेत. या […]
धक्कादायक : पुण्यात तरुणीचे अपहरण करून बलात्कार
राज्यात सातत्याने महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. महिला अत्याचाराच्या घटनां चिता व्यक्त होत असताना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात एक तरुणीचे अपहरण करून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ऑफिसमधून घरी जात असताना एका तरुणाने या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलत्कार केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात राहणारी हि तरुणी ऑफिसमधून सायकली घरी […]
चाकणच्या कंपनीतील ट्रिपला गेलेली बस पसरणी घाटात पलटली
वाई : चाकण येथील एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन वार्षिक सहलीसाठी निघालेली बस पसरणी घाटात पलटी झाली आहे. पाचगणी-वाई रस्त्यावर पसरणी घाटात ब्रेकफेल झाल्याने चालकाचा ताबा सुटून अवघड वळणावर बस उलटली, या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. या बसमधून एकूण ३४ प्रवासी प्रवास करत होते. प्रतापगड-महाबळेश्वर येथे सहलीसाठी ही खासगी बस गुरुवारी येथे आली होती. […]
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला फोनद्वारे अर्वाच्य भाषेत धमकी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांना एका व्यक्तीने अर्वाच्य भाषा वापरत धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. चाकणकर यांचे धायरी येथील कार्यालय पेटवून देण्याची धमकी त्यांना फोनद्वारे देण्यात आली आहे. जयंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा जि. सांगली) असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याच्याविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]
मनसे कार्यकर्त्यांकडून ॲमेझोनच्या कार्यालयाची तोडफोड
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अॅमेझॉनमधील वाद आता शिगेला पोहचला आहे. पुण्यातील कोंढवा भागातील ॲमेझोनच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘मराठी नाय तर अॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजीही केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसे आक्रमक झाली असून अॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडलं आहे. दरम्यान, अॅमेझॉनवर […]