बातमी विदर्भ

महाराष्ट्राला काळीमा! जातपंचायतीच्या जाचामुळे बहिणींकडून वडिलांच्या पार्थिवाला खांदा

चंद्रपूर : जातपंचायतीच्या जाचामुळे 7 बहिणींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहरात उघडकीस आली आहे. चंद्रपूर शहरातील भंगाराम वॉर्ड येथील ही घटना असून यामुळे जातपंचायतीचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. काय आहे घटना.. प्रकाश ओगले यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. प्रकाश ओगले यांच्या मृत्यूचा निरोप नातलगांना देण्यात आला. […]

बातमी विदर्भ

गडचिरोलीत पोलिसांची मोठी कारवाई; चकमकीत १३ नक्षलवादी ठार

गडचिरोली : पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये गडचिरोलीत चकमक झाली असून या कारवाईत १३ नक्षलवादी ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. एटापल्लीमधील पेदी कोटमी येथील जंगलात झालेल्या या चकमकीत महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० युनिटकडून ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळपासून नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. जंगलात अभियान सुरू असताना नक्षलवाद्यांचे शिबिर सुरू […]

बातमी विदर्भ

विदर्भात वाघाची दहशत; एकाच दिवसाता तिघांचा मृत्यू

चंद्रपूर : विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने दहशत निर्माण केली असून बुधवारी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघाच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. शिवाय एक वनरक्षक देखील वाघाच्या हल्ल्यात जखमी झाला आहे. पहिल्या घटनेत सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव जवळील पेंढरी येथील दिवाण तलाव परिसरात बुधवार १९ मे ला सकाळच्या सुमारास कोकेवाडा, पेंढरी येथे राहणाऱ्या […]

बातमी विदर्भ

धक्कादायक! नदीच्या पात्रात बुडून तीन मुलींचा मृत्यू

गडचिरोली : वैनगंगा नदी पात्रात बुडून तीन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यीत चामोर्शी तालुक्यात ही घटना घडली आहे. मुली नावेतून नदीपार जात होत्या. त्याचवेळी नाव बुडाली आणि तिघींचा मृत्यू झाला. ही घटना आज (ता. १८) मंगळवारी दुपारी घडली. तीनही मुली नावेतून प्रवास करत असताना तोल जाऊन खाली पडल्या, या मुलींना पोहता येत […]

बातमी विदर्भ

गडचिरोलीमध्ये सी-60 कमांडोंच्या चकमकीत 2 माओवाद्यांचा खात्मा

गडचिरोली : गडचिरोलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून माओवाद्यांनी डोके वर काढले आहे. सावरगावलगत सी-60 कमांडो आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली. चकमकीत दोन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली पोलिसांच्या सी सिक्स्टी पथकाच्या जवानाचे अभियान सुरू केले आहे. अभियान सुरू असताना माओवाद्यांनी अचानक पथकावर गोळीबार केला. त्याला जवानांनी जशास तसे प्रतिउत्तर दिले. अर्ध्या तासाच्या चकमकीनंतर दोन […]

बातमी विदर्भ

भाजप खासदारांविरुद्ध वर्धा पोलिसांत गुन्हा दाखल

वर्धा : भाजप खासदार रामदास तडस यांच्याविरुद्ध वर्धा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी आमदार रणजित कांबळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपचे खासदार रामदास तडस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप असून, याप्रकरणी खासदार तडस […]

बातमी विदर्भ

धक्कादायक ! यवतमाळमध्ये गर्भवती वाघिणीला जाळलं जिवंत

यवतमाळ : गर्भवती वाघिणीला नखांसाठी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात सोमवारी सकाळी घडली आहे. या वाघिणीच्या समोरील पायाचे पंजे शिकाऱ्यांनी कापून नेले. सुमारे महिनाभरापूर्वी झरी तालुक्यात देखील वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. यवतमाळ जिल्ह्यात एकाच महिन्यात दोन वाघांच्या शिकारी उघडकीस आल्याने चर्चांना उधाण आले आहे. पांढरकवडा वन विभागाअंर्गत मुकु टबन परिक्षेत्रातील मांगुर्ला […]

बातमी विदर्भ

भयानक ! भंडाऱ्यातील परिस्थिती वाईट; लाईनमध्येच रचून ठेवल्या आहेत चिता

भंडारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भंडारा जिल्ह्यात परिस्थिती अतिगंभीर होताना दिसत असून भंडाऱ्याच्या स्मशानभूमीचं भयावह चित्र समोर आलं आहे. भंडारा स्मशानभूमीत मृत्यूपूर्वीच सरण रचून ठेवण्याची दुर्देवी वेळ भंडारा प्रशसानावर आली असून एकाच वेळी 20-25 कोरोनाबाधित मृतावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. भंडारा जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. […]

बातमी विदर्भ

धक्कादायक ! राज्याच्या माजी मंत्र्यांचे कोरोनामुळे निधन

चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून यातून कोणीही सुटताना दिसत नाहीये. राज्याचे माजी पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, वरोरा-भद्रावती विधानसभेचे माजी आमदार संजय देवतळे यांचे आज (ता. २५) नागपुरात कोरोनावरील उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ यांच्यासह मोठा परिवार आहे. मृदू स्वभावाचे राजकारणी […]

बातमी विदर्भ

धक्कादायक ! यवतमाळमध्ये सॅनिटायझर पिल्याने सात जणांचा मृत्यू

यवतमाळ : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत दारु विक्रीवरही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. यातूनच यवतमाळमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. दारूची तलफ झाल्यानंतर काही जणांनी सॅनिटायझर पिल्याने सात जणांचा मृत्यू झाला असून आणखी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं समोर आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी गावात ही घटना घडली […]