पुणे बातमी

लवकरच समाज कल्याण विभागाला केंद्र सरकारकडून निधी मिळणार – आयुक्त प्रशांत नारनवरे

नवी दिल्ली : येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थित महाराष्ट्रातील महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष विभागासोबत इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील प्रलंबित विषयावर या बैठकीत चर्चा झाली तसेच केंद्र सरकारकडून निधी देण्याविषयी चर्चा झाली. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी लवकरच समाज कल्याण विभागाला केंद्र सरकारकडून निधी मिळेल, असे आश्वासन दिल्याची माहिती […]

देश बातमी

अभिनेता सोनू सूदने २० कोटी रुपयांचा कर चुकवल्याची आयकर विभागाची माहिती

नवी दिल्ली : अभिनेता सोनू सूदने २० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर चुकवला असल्याचे आयकर विभागानं आज एका निवेदनाद्वारे जाहीर केले आहे. आयकर विभागाने सलग तीन दिवस सोनू सूदच्या मुंबईच्या घरी जाऊन यासंदर्भात शोध घेतला होता. सोनूने परदेशी देणगीदारांकडून क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून २.१ कोटी रुपये गोळा केले असून परदेशी योगदान (नियमन) कायद्याचे उल्लंघन केले आहे, […]

देश बातमी

पोटच्या चार मुलींना मारून पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न

नवी दिल्ली : पोटच्या चार अल्पवयीन मुलींना पाण्यात बुडवून मारल्यानंतर पित्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या पोशाला गावात घडली आहे. ३० वर्षीय बापाने मुलींना पाण्यात बुडवून मारण्यापूर्वी विष दिल्याचीही संतापजनक बाब समोर आली आहे. शेजाऱ्याने त्याला पाण्यात उडी घेताना पाहिल्यानंतर पोलिसांना कळवलं. या घटनेत आरोपी पूर्खा राम बचावला आहे. तर, झिओ (९), नोजी (७), […]

देश बातमी

लहान मुलांच्या लसीबाबत अदर पूनावालांची मोठी घोषणा

पुणे : सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. सिरम इन्स्टिट्युटच्या पुण्यातील मांजरीतील प्लांटमध्येच कोविशिल्ड लसींची उत्पादन सुरू आहे. १८पेक्षा वरच्या सर्वांना ही लस दिली जात असून आता १८ वर्षांखालील वयोगटाच्या लोकसंख्येला देखील लस मिळण्याची प्रतीक्षा लागलेली आहे. शुक्रवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये अदर पूनावाला यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं […]

देश बातमी

धक्कादायक! कुटुंबातील ५ जणांची आत्महत्या; चिमुरड्याचा भुकेनं मृत्यू

बंगळुरु : बंगळुरमध्ये एकाच कुटुंबातल्या पाच जणांनी आत्महत्या केल्याचं उघड झाले आहे. त्याचवेळी घरातल्या एका ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा भुकेनं तडफडून मृत्यू झाल्याचा प्रकार पोलिसांना निदर्शनास आला असून एक अडीच वर्षांची मुलगी वाचली आहे. घरातीलच एक सदस्य काही दिवसांनी बाहेरगावाहून घरी परतल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊ या प्रकरणाचा […]

बातमी मुंबई

एटीएसची मोठी कारवाई, मुंबईतून संशयित दहशतवाद्याला अटक!

मुंबई : आज पहाटे महाराष्ट्र एटीएसनं मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच पथकासोबत केलेल्या या कारवाईत मुंबईच्या जोगेश्वरी भागातून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात एटीएसला यश आलं आहे. या संशयित दहशतवाद्याचं नाव झाकिर असल्याचं सांगितलं जात आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करत संशयित दहशतवादी […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात काल विक्रमी लसीकरणाची नोंद; नव्या रुग्णांचा मात्र आकडा कमी होईना

नवी दिल्ली : देशभरात काल विक्रमी लसीकरणाची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात अडीच कोटी लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. मात्र, देशातील नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची आकडेवारी काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. काल ३४ हजार ४०३ रुग्ण आढळल्यानंतर आज रुग्णसंख्या ३५ हजारांवर गेली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३५ हजार ६६२ कोरोनाबाधित आढळले असून ३३ […]

देश बातमी

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत नाही : निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलला जीएसटी कक्षेत आणणार नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. केरळ उच्च न्यायालयाने पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या मुद्द्यावर जीएसटी परिषदेचा अभिप्राय विचारला होता. केवळ त्या कारणामुळे बैठकीच्या विषयपत्रिकेवर हा मुद्दा आला होता. याबाबत स्पष्टीकरण देताना सीतारामन म्हणाल्या, न्यायालयाच्या निर्देशामुळे हा विषय विचारार्थ घेतला गेला आणि सदस्यांनी स्पष्टपणे पेट्रोल-डिझेल […]

बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीचे दुप्पट वयाच्या पुरुषासोबत लग्न लावून…

नगर : नगर जिल्ह्यात अमानुषतेचा कळस गाठणारी घटना समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. येथील एका 13 वर्षीय मुलीचा 24 वर्षीय तरुणासोबत जबरदस्तीने विवाह लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढंच नव्हे तर नवऱ्या मुलानं पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवत तिला जिवंतपणी नरक यातना दिल्या आहेत. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईसह आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला […]

देश बातमी

उत्तरप्रदेशातील जोडप्याचं दिल्लीतून अपहरण; मध्यप्रदेशात हत्या अन् फेकलं वेगवेगळ्या राज्यात

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील एका जोडप्याचं दिल्लीतून अपहरण करुन मध्यप्रदेशात हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर मुलीचा मृतदेह मध्यप्रदेशात फेकून मुलाचा मृतदेह राजस्थानमध्ये फेकण्यात आला आहे. या घटनेच्या तपासात पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. मृतदेह मिळाल्याच्या ४२ दिवसानंतर हत्येचा उलगडा झाला आहे. शेजारी राहणाऱ्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. मात्र कुटुंबीयांच्या त्यांच्या प्रेमाला विरोध […]