देश बातमी

मोदी सरकारद्वारे मेगा विक्री: या ६ कंपन्या लवकरच विकल्या जाणार

नवी दिल्ली : सध्या सुरू असलेल्या या आर्थिक वर्षात आणखी ६ सरकारी कंपन्या विकण्याची मोदी सरकारची योजना आहे. बीपीसीएल (BPCL) व्यतिरिक्त बीईएमएल (BEML), शिपिंग कॉर्प (Shipping Corp), पवन हंस, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक आणि नीलांचल इस्पात यांचा यामध्ये समावेश आहे. बीपीसीएलच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, बीईएमएल, शिपिंग कॉर्प, पवन हंस, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक आणि नीलांचल इस्पात यांची […]

देश बातमी

नकारात्मक कारणांसाठी सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींमध्ये मोदींचा समावेश

नवी दिल्ली : अमेरिकेमधील टाइम या जगप्रसिद्ध मॅगझिनच्या २०२१ मधील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश करण्यात आला आहे. मात्र मोदींचा समावेश हा नकारात्मक कारणांसाठी करण्यात आला आहे. मोदींचा उल्लेख या यादीमध्ये ज्या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे तो उल्लेख मान वाढवणारा नसून देशाच्या प्रतिमेसंदर्भात शंका घेणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा २०२१ मधील […]

देश बातमी

काँग्रेस आमदाराला पोलिसांनी घरात जाऊन ठोकल्या बेड्या

नवी दिल्ली : तीन वेळा आमदार राहिलेल्या शर्मन अली अहमद यांना काँग्रेस पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राज्यात गेल्या आठवड्यात पार पडलेल्या हटाव मोहिमेत झालेल्या हिंसाचारावर भाष्य करताना आसामचे काँग्रेस आमदार शर्मन अली अहमद यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अटकेची कारवाई करण्यात आली आहे. शर्मन अली अहमद यांनी माथी भडकावणारं […]

देश बातमी

पेट्रोल-डिझेलचे पुन्हा वाढले दर; पाहा आजच्या किमती

नवी दिल्ली : देशभरामध्ये गुरुवारी म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी इंधनदरवाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर २५ पैसे प्रती लिटरने वाढवण्यात आले असल्याने कालपर्यंत १०१.३९ रुपयांना मिळणारं पेट्रोल आज १०१.६४ रुपयांना मिळत आहे. तर डिझेलच्या दरांमध्ये ३० पैसे प्रती लिटरने वाढ करण्यात आली आहे. कालच्या ८९.५७ रुपये प्रती लिटरवरुन आज डिझेलचे दर ८९.८७ रुपये प्रती […]

देश बातमी

शेतकरी आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू

नवी दिल्ली : हरियाणातील सिंघू सीमेवर आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शवविच्छेदनानंतर अधिक तपशील शेअर केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. केंद्राच्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांचा निषेध करण्यासाठी सोमवारी संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवली आहे. सिंघू सीमेवरील शेतकऱ्यांनी दिल्ली-हरियाणा मार्गावरील १४ प्रवेश […]

देश बातमी

महिला पोलिसांवर तिघांचा बलात्कार; रेकॉर्ड केला व्हिडिओ

नवी दिल्ली : महिला पोलिस कॉन्स्टेबलवनर तीन जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशच्या नीमच जिल्ह्यात घडली आहे. आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ शूट केला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्याच्या आईला अटक करण्यात आली आहे, तर इतर तिघे फरार आहेत, असे महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी अनुराधा […]

देश बातमी

सोने महिन्यातील निच्चांकी दरावर; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४५,२४० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४५,२४० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५९,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,२४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा […]

देश बातमी

यूपीएससी मुख्य परीक्षेत हेतल पगारेचे यश

नवी दिल्ली : लोकसेवा आयोगाच्या मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परिक्षेमध्ये हेतल पगारे हिने मोठे यश मिळवले आहे. मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण 761 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये हेतल पगारे हिला ६३० रँक मिळाली आहे. यामध्ये सुभम कुमार यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. परीक्षार्थी https://www.upsc.gov.in/ या वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतात. […]

देश बातमी

युपीएससीत महाराष्ट्राचा डंका; नितिषा जगतापची २१व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात बाजी

मुंबई : नागरी लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा 2020 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 761 उमेदवारांनी यश प्राप्त केले असून ते महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही मोठे यश संपादन केले आहे. लातूरच्या नितिषा जगताप या विद्यार्थीनीने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात १९९ वी रँक मिळवून युपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. तर […]

देश बातमी

रस्ते अपघात टाळण्यासाठी नितीन गडकरींची भन्नाट योजना

नवी दिल्ली : देशभरात दरवर्षी होणाऱ्या अपघातांमध्ये जीवितहानी होत असल्यामुळे त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणं आवश्यक झालं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासनाला नवे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये नितीन गडकरींनी हे आदेश दिले आहेत. तसेच, त्यासंदर्भात सर्व राज्य सरकारे आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखील निर्देश दिले जातील, […]