टेक इट EASY

मोठी बातमी : आता गुगल पे वरून पैसे पाठविण्यासाठी लागणार फी

नवी दिल्ली : आपण पैसे पाठविण्यासाठी बऱ्याचवेळा गुगल पेचा वापर करत असतो. पण आता गुगल पे पैसे पाठविण्यासाठी चार्ज आकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. गुगल पे चे आता पैसे ट्रान्सफर मोफत असणार नाही. बॅंक टू बॅंक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी फीस आकारली जाणार आहे. कंपनीने यासाठी तयारी सुरु केली आहे. टेक साईड बिझनेस इनसाइडर यांनी […]

टेक इट EASY

व्हाट्सअपने आणलेलं नवीन फिचर तुम्हाला माहिती आहे का?

मुंबई : युजर्सना आकर्षित करण्यासाठी व्हॉट्सएप नेहमी स्वत:मध्ये अपडेट आणत असतं. यूजर्सला चॅटींग सोपी जावी यासाठी व्हॉट्सएप नवनवे प्रयोग करत असतं. नुकतेच व्हॉट्सएपने नवे फिचर्स आणले आहे. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? डिसअॅपिअरिंग मेसेज (Disappearing Messages) नावाचं हे नवीन फीचर आहे. डिसअॅपिअरिंग मेसेज Disappearing Messages हे नवे फिचर व्हॉट्सएपने आणलं असून त्यानुसार तुम्ही समोरच्या व्यक्तीला […]

टेक इट EASY

केंद्र सरकारचा आणखी एक दणका; स्नॅक व्हिडीओसह ४३ अ‍ॅपवर बंदी

नवी दिल्ली : चिनी अॅप्सवर डिजीटल स्ट्राईक केल्यानंतर केंद्रसरकारने आणखी एक दणका दिला आहे. केंद्र सरकारकडून स्नॅक व्हिडीओसह आणखी ४३ अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान कायच्याच्या ६९ ए अंतर्गत केंद्र सरकारनं ही कारवाई केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारनं या अ‍ॅप्सवर बंदीची कारवाई केल्याचं सांगण्यात आलं आहे. बंदी घातलेली सर्व अ‍ॅप्स भारताचं सार्वभौमत्व, […]

टेक इट EASY

जिओचा ‘हा’ धमाकेदार प्लॅन; दररोज मिळतो 3 जीबी डेटा

जिओ आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन प्लॅन घेऊन येत असतो. आता नुकताच जिओने एक धमाकेदार प्लॅन आपल्या ग्राहकांसाठी आणला आहे. या प्लॅन मध्ये  ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये दररोज 3 जीबी डेटा म्हणजे एकूण 84 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये जिओ टू जिओ कॉलिंग अनलिमिटेड आहे, तर […]

टेक इट EASY

Airtel ची भन्नाट ऑफर; केवळ 19 रुपयांत मिळणार अनलिमिटेड कॉलिंग

टेलिकॉम कंपन्या आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्लान बाजारात आणत असतात. यात आता ऐअरटेलने आघाडी घेतली आहे. कंपनीने 19 रुपयांत स्वस्त प्लान ऑफर केला आहे, ग्राहक त्यांच्या सोयीनुसार हा प्लान रिचार्ज करू शकतात. ऐअरटेलने हा 19 रुपयांचा प्लान ‘Truly Unlimited’ कॅटेगरीमध्ये ठेवला आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आहे. फ्री कॉल ही […]

टेक इट EASY बातमी

मोठी बातमी : युट्यूबवर जाहिरात दिसणार; पण क्रिएटर्सला मिळणार नाहीत पैसे

नवी दिल्ली : यूट्यूबवर जाहिरात दाखवल्यानंतर छोट्या छोट्या क्रिएटर्संना पैसे मिळत होते. परंतु, आता ते मिळणार नसल्याचे यूट्यूबने स्पष्ट केले आहे. युट्यूबने यात बदल केला असल्याचे सांगितले आहे. अनेक क्रिएटर्सच्या व्हिडिओवर जाहिराती दाखवल्यानंतरही त्यांना पैसे दिले जाणार नाहीत. नवीन मॉनेटाइजेशन रुल्सच्या हिशोबाप्रमाणे जर क्रिएटर्स यूट्यूबच्या पार्टनर प्रोग्रामचा भाग नसेल, किंवा त्याच्या व्हिडिओवर अॅड दाखवली जावू […]

टेक इट EASY

धक्कादायक ! बिगबास्केटच्या 2 कोटी ग्राहकांचा डेटा लीक

प्रगत तंत्रज्ञानामुळे चोरी करण्याचे प्रकारही आता बदलले आहेत. त्यात डेटा चोरीचे अर्थात हॅकींगचे प्रमाण वाढले आहे. तर ऑलनाईन खरेदीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे चोरांना कोणाच्याही माहितीची चोरी करणे सोप झालं आहे. अशाच एका ऑनलाईन कंपनीच्या 2 कोटी ग्राहकांचा डेटा लीक झाल्याचे समजते. आजकाल ग्राहक भाजी, किराणादेखील ऑनलाईन खरेदी करतात. यासाठी बिगबास्केट (bigbasket) हे मोठं ऑनलाईन […]

LG-Phone
टेक इट EASY

4 GB RAM, 48 MP Camera सह LG चा स्मार्टफोन मिळतोय सर्वात स्वस्त

नवी दिल्ली : सध्या विविध कंपन्यांचे स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. 3 हजार रुपयांपासून ते अगदी 60 हजार आणि त्याहीपेक्षा महाग स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. पण आता LG ने आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB RAM आणि 48 MP Camera देण्यात आला आहे. भारतात LG कंपनीचा बहुप्रतिक्षित LG Velvet Dual Screen हा स्मार्टफोन लाँच […]

टेक इट EASY

दिवाळीत पैशांची चणचण ? ‘या’ ॲपवरून खरेदी करा अन् महिन्यानंतर पेमेंट करा

करुणा संसर्गा नंतर देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यातच सण आले आहेत .दिवाळीत प्रत्येक जण काहीना काही खरेदी करत असतो. मात्र मंदीमुळे अनेकांच्या खिशात पैसे उरले नाही. अशा स्थितीतही काळजी करण्याचे कारण नाही. पेटीएम तुमच्या मदतीला धावून आले आहे. देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी असलेल्या पेटीएमकडूनही Buy Now Pay […]

phone
टेक इट EASY

मोबाईलमधील कचरा घालवा काही मिनिटांतच…

नवी दिल्ली : आपण अनेकजण स्मार्टफोनचा वापर करत असाल. हा स्मार्टफोन वापरताना अनेकदा फोन हँग होणे किंवा हेवी होणे, हे प्रकार अनुभवायला मिळत असतीलच. मग काय करावे हा प्रश्न पडतो. पण आता तुमचा हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. गुगलने नवीन Files Go ऍप लाँच केले आहे. या ऍपच्या मदतीने आपण फोनमधील स्पेस मोकळी करू शकतो […]