क्रीडा

मोठे वक्तव्य : विराट कोहलीशिवाय आम्ही जिंकू शकतो, विधानाने खळबळ

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माची वनडे संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली. या बदलावरून सोशल मीडियावर विराट कोहली विरुद्ध सौरव गांगुली असा वाद चाहत्यांमध्ये सुरू असताना बीसीसीआयच्या अध्यक्षांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला, काही वर्षापूर्वी झालेल्या आशिया कप (२०१८) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने […]

क्रीडा

पाकिस्तानी क्रिकेटपटू इंझमामला हृदयविकाराचा झटका; सचिनचे ट्वीट

मुंबई : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरने इंझमामसाठी एक ट्वीट केले आहे. सध्या यूएईमध्ये मुंबई इंडियन्सला मार्गदर्शन देणाऱ्या सचिन तेंडुलकरने ट्वीट करून त्याचा मित्र आणि जुना प्रतिस्पर्धी इंझमाम-उल-हकसाठी संदेश पाठवला आहे. सचिनने लिहिले आहे की, ‘इंझमाम तू लवकर बरा हो, मला हेच हवे […]

क्रीडा

IPL2021 : कोलकात्याचा दिल्लीवर ३ गडी राखून रोमहर्षक विजय

शारजा : कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा ३ गडी राखून पराभव केला आहे. नाणेफेक जिंकलेल्या कोलकाताने दिल्लीला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. दिल्लीने २० षटकात ९ बाद १२७ धावा केल्या. पृथ्वीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या स्टीव्ह स्मिथ आणि कप्तान ऋषभ पंतने प्रत्येकी ३९ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने आपले सात फलंदाज गमावले पण नितीश राणाच्या नाबाद ३६ आणि सुनील […]

क्रीडा

चेन्नईच्या स्टार खेळाडूचा निवृत्ती घेण्याचा निर्णय

चेन्नई : आयपीएल २०२१च्या दुसऱ्या पर्वामध्ये चेन्नईचा संघ गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी असतानाच चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो आता इंग्लंडकडून रेड बॉल क्रिकेट म्हणजेच कसोटी सामने खेळणार नाही. लवकरच तो यासंदर्भातील अधिकृत घोषणा करणार आहे. मोईनने आपल्या या निर्णयाबद्दल इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट, प्रशिक्षक क्रिस सिल्वरवूड […]

क्रीडा

रविंद्र जडेजाची कामगिरी दमदार; एकहाती फिरवला सामना

दुबई : सर रविंद्र जडेजाने दमदार कामगिरी करत चेन्नईला विजय मिळवून दिला आहे. अटीतटीच्या सामन्यात चेन्नईने कोलकात्यावर २ गडी राखून मात केली. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात खऱ्या रवींद्र जडेजा बाजीगर ठरला. संघातील खेळाडू झटपट बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजाने १९ व्या षटकात आक्रमक खेळी करत विजय जवळ खेचून आणला. रविंद्र जडेजाने ८ चेंडूत २२ धावा केल्या. […]

क्रीडा

राजस्थानचा ३३ धावांनी पराभव; सॅमसनची झुंज अपयशी

दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने उत्कृष्ट गोलंदाजी करत राजस्थान रॉयल्सला ३३ धावांनी पराभव केला आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय राजस्थानच्या गोलंदाजांनी सार्थकी लावला. दिल्लीच्या श्रेयस अय्यरने केलेल्या ४३ धावांच्या जोरावर त्यांना राजस्थानसमोर १५५ धावांचे आव्हान ठेवता आले. प्रत्युत्तरात राजस्थानचे स्टार फलंदाज दबावात फलंदाजी करण्यात अपयशी ठरले. कर्णधार संजू […]

क्रीडा

रद्द झालेल्या कसोटीबाबत बीसीसीआय आणि ईसीबीने घेतला निर्णय

नवी दिल्ली : भारताचा इंग्लंड दौऱ्यावरील शेवटचा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर क्रिकेट चाहते निराश झाले होते. आता या सामन्यांविषयी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून याबाबत बीसीसीआय आणि ईसीबीने एक निर्णय घेतला आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान रद्द झालेल्या मँचेस्टर कसोटीच्या जागी २०२२मध्ये भारत इंग्लंडमध्ये एक कसोटी सामना खेळेल. क्रिकेट वेबसाइट ईएसपीएन-क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, भारतीय क्रिकेट […]

क्रीडा

आता फलंदाजाला बॅट्समनऐवजी वापरण्यात येणार हा शब्द

नवी दिल्ली : मेरिलेबॉन क्रिकेट क्लबने (एमसीसीने) एक मोठी घोषणा केली आहे. क्रिकेट नियमात बदल करत बॅट्समन ऐवजी जेंडर न्यूट्रल टर्मनुसार बॅटर किंवा बॅटर्स संबोधलं जाणार आहे. या बदलला एमसीसीने मान्यता दिली आहे. यापूर्वी क्लबच्या विशेष लॉ सब कमिटीने यावर निर्णय घेतला होता. बॅटर हा शब्द सर्वसमावेशक असल्याने क्रिकेटची स्थिती बदलेल, असं एमसीसीकडून सांगण्यात आलं […]

क्रीडा

महाराष्ट्रातील धावपटूचा स्पर्धा सुरु असतानाच मृत्यू

पंढरपूर : क्रीडा क्षेत्रातून एक धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील धावपटू बंडू वाघमोडे याचा हरियाणात मृत्यू झाला आहे. स्पर्धा सुरू असताना बंडू वाघमोडे हा मैदानात कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. धावपटू बंडू वाघमोडे हा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील निवासी होता. हरियाणातील रोहतक येथे आंतरराज्य मैदानी स्पर्धांचे आयोजन केले आहे. […]

क्रीडा

आयपीएलवर पुन्हा कोरोनाचे संकट! एकाला लागण; सहा जणांचे विलगीकरण

दुबई : आयपीएलवर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट निर्माण झालं आहे. सनरायजर्स हैद्राबादचा गोलंदाज टी नटराजनला कोरोनाची लागण झाल्याने सहा जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. टी नटराजनसोबत हैद्राबादचा आणखी एक खेळाडू विजय शंकर आणि पाच सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यामध्ये टीम मॅनेजर विडय कुमार, फिजिओथेरपिस्ट श्याम सुंदर जे, डॉक्टर अंजना वन्नन, लॉजिस्टिक मॅनेजर तुषार खेडकर, […]