‘स्वारातीम’ विद्यापीठाचा २९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
बातमी मराठवाडा

‘स्वारातीम’ विद्यापीठाचा २९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २९ व्या वर्धापनदिनानिमित्त दि. १७  सप्टेंबर रोजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते प्रथमता प. पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सकाळी ०८:२७ वा. राष्ट्रीय ध्वजारोहण आणि ०८:३० वा. विद्यापीठ ध्वजारोहण कुलगुरू महोदयांच्या हस्ते संपन्न झाले. यानिमित्त राष्ट्रगीत, महराष्ट्रगीत आणि विद्यापीठ गीताचे गायन करण्यात आले. यानंतर कुलगुरू महोदयांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उपस्थितांना प्रतिज्ञा देण्यात आली. याबरोबर विद्यापीठाच्या स्वागत कक्षामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी कुलगुरूंनी उपस्थितांना वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देत विद्यापीठाची विकासाच्या दृष्टीने होत असलेली वाटचाल यावर थोडक्यात माहिती दिली. यावेळी वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते. कुलगुरू महोदयांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. वाहन चालक दिनानिमित्त विद्यापीठातील सर्व वाहन चालकांना कुलगुरू डॉ. उद्धव भोसले व मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, मा. व्यवस्थापन परिषद सदस्य, मा. अधिसभा सदस्य, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्र.अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, मानव्य विद्याशाखेचे प्र.अधिष्ठाता डॉ. विकास सुकाळे, प्र. वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मलीकार्जुन करजगी यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले.