बातमी मराठवाडा

बीड जिल्ह्यात तीन दिवसांत कोरोनाचा चौथा बळी; बळींची संख्या…

बीड : बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून मागील तीन दिवसांत कोरोनाने चार बळी घेतले आहेत. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत 29 नवे रुग्ण आणि तीन बळी गेल्यानंतर आज पुन्हा एका रुग्णाचा कोरोनाने बळी घेतला. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ११ वर पोहोचली आहे. सुरुवातीच्या काळात कोरोनाशी दोन हात करत कोरोनाला […]

बातमी मराठवाडा

नांदेड जिल्हाही लॉकडाऊन; ‘या’ आठ दिवसांसाठी संचारबंदीचे आदेश

नांदेड : काही दिवसांपासून जिल्ह्यातील नागरिकांना उत्सुकता आलेल्या संचारबंदीचे आदेश अखेर पारित केले आहे. दि. 12 ते 20 जुलैपर्यंत हे आदेश कायम राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येला अटकाव घालण्यासाठी वेगवेगळया जिल्ह्यात संचारबंदी लावली जात आहे. या पार्श्वभूमिवर नांदेड जिल्हयात ही संचारबंदी लावण्यात यावी, अशी मागणी जोर […]

बातमी मराठवाडा

लातुरात कोरोनाचे तांडव, एका दिवसात तिघांचा मृत्यू; मृत्यूचा आकडा…

लातूर : गेल्या काही दिवसापासून लातूर जिल्ह्यात एकीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणाही वाढू लागले आहे. एकाच दिवशी तीघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू होण्याची संख्या ३२ वर गेली आहे. काल (ता. १०) एकाच दिवशी तीघांचा कोरोनामुळे उपचारा दरम्यान तिघांचा मृत्यू झाला आहे. या तीनही व्यक्ती वृद्ध व्यक्ती आहेत. […]

बातमी मराठवाडा

वाहनाच्या धडकेत भाजप माजी आमदाराच्या मुलाचा मृत्यू

परभणी : भाजपाचे माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा परभणीत शुक्रवारी अपघाती मृत्यू झाला आहे. परभणी शहरातील उड्डाणपुलावर मोहन फड यांचा मुलगा पृथ्वीराज फड याच्या दुचाकीचा अपघातात झाला. माजी आमदार मोहन फड यांचा मुलगा पृथ्वीराज फड मुंबईमध्ये शिक्षण घेत होता. राज्यात कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर झाला आहे. त्यामुळे पृथ्वीराज मुंबईहून परभणीला आला होता. शुक्रवारी संध्याकाळी तो […]

बातमी मराठवाडा

कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्काराचा खर्च करणार; ‘या’ नगरपालिकेने घेतला मोठा निर्णय

जालना : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना लोकांसमोर अनेक संकटे उभी राहत आहेत. कोरोनामुळे जालना शहरातील व्यक्तींचा मृत्यू झाल्यास या पूढे त्यांच्या अंत्यसंस्काराचा खर्च नगरपालिका उचलणार आहे. त्यासाठी दहा लाख रूपयांची तरतूद करण्यात आल्याचे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी सांगितले. तसेच, यासाठी तत्काळ दहा लाख रुपयांच्या निधीची तरतूद ही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जालना शहरात […]

बातमी मराठवाडा

भाजप झेडपी सदस्याच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

नेकनूर (बीड) : बीड जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली असून भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्याच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. शेतातील वादामुळे नेहमीच्या त्रासाला कंटाळून किसन धोंडीबा डोईफोडे वय ५२ या शेतकऱ्याने आज (ता. ०७) मंगळवारी फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी भाजपचे जिल्हा परिषद सदस्या राणा डोईफोडे आणि त्यांच्या […]