कोकण बातमी

मोठी बातमी! नारायण राणेंना विजेचा शॉक

कणकवली: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जन आशीर्वाद यात्रेदरम्यान एके ठिकाणी हाताला विजेचा शॉक लागला. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रत्नागिरीतून जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू केल्यानंतर केंद्रीय मंत्री राणे आज सिंधुदर्गातील कणकवली येथे दाखल झाले. तेथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ते तेथून निघत होते. आसपास मोठी गर्दी […]

कोकण बातमी

आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांची महाडमधील पूरग्रस्तांना मदत

महाड (ता. २८) : मुंबई येथिल राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या ५० स्वयंसेवकांनी उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड येथे पुरामुळे मोठ्या प्रमाणात हानी झालेल्यांना आणि नूकसान झालेल्या पूरग्रस्तांसाठी जीवन उपयोगी वस्तूंचे वाटप व मदतकार्य सुरु केले आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या महाड शहराला पुराच्या संकटात आजूबाजूच्या ७ ते ८ गावांना पुन्हा […]

कोकण बातमी

कोकणातील काँग्रेसनेत्याचे कोरोनामुळे निधन

महाड : महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार काँग्रेसनेते माणिकराव जगताप यांचे रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. आज दुपारी 2 वाजता त्यांची अंत्ययात्रा महाड येथील त्यांच्या निवास स्थानावरून निघेल. रायगड जिल्हा काँग्रेसचं अध्यक्षपद सध्या त्यांच्याकडे होतं. १९९९मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली, त्यावेळी ते राष्ट्रवादीत सामील […]

कोकण बातमी

दरड कोसळून मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई: राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे (दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा […]

कोकण बातमी

संकट टळलेलं नाही; कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई : दोन दिवसांपासून सुरु असलेला पाऊस पुढचे दोन दिवस देखील असाच अतिमुसळधार कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २३ जुलै आणि २४ जुलै या दोन दिवसांमध्ये कोकण, गोवा आणि किनारपट्टीला लागून असलेल्या पश्चिम घाट, तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये […]

कोकण बातमी

रायगडमधील तळई गावात कोसळली दरड; ३६ जणांचा मृत्यू, ४० बेपत्ता

रायगड : रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळई येथे दरड कोसळून याखाली ३२ घरे दबली गेली होती. सकाळी या ठिकाणी मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले होते. यात आतापर्यंत ३६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे, तर आणखी ४० जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेत तळई येथे ३२ जणांचा […]

कोकण बातमी

कोकणात ऑरेंज अलर्ट, तर अशी असेल असेल मुंबई-पुण्याची स्थिती

मुंबई : मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राची राजधानी मुंबईला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. अशात आज दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. संबंधित तीन जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आकाशात मेघगर्जनेसह वेगवान वारा वाहण्याची शक्यता आहे. यासोबतच गोवा किनारपट्टीवर देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. […]

कोकण बातमी

कोकणातील माजी आमदाराचे वाढदिवसादिवशीच निधन

अलिबाग : काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं त्यांच्या वाढदिवसादिवशीच निधन झालं आहे. अलिबाग उरण मतदारसंघाचे माजी आमदार असणारे मधुकर ठाकूर यांनी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते. १५ जुलै रोजीच त्यांचा वाढदिवस असतो. दुर्दैवाने वाढदिवशीच त्यांची प्राणज्योत मालवली. मधुकर ठाकूर मागील तीन ते चार वर्षांपासून आजारी होते. झिराड ग्रामपंचायतीच्या […]

कोकण बातमी

काशीदमध्ये पूल कोसळल्याने अलिबाग-मुरुड वाहतूक विस्कळीत

अलिबाग : अलिबाग-मुरुड मार्गावर काशीद येथील छोटा पूल कोसळला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जीर्ण झालेला हा पूल अतिवृष्टीमुळे कोसळला असून यावेळी पूलावरील दोन वाहने देखील कोसळली मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. सहा जणांना वाहनांमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. […]

कोकण बातमी

आमदार वैभव नाईकांसह ४० जणांवर गुन्हे दाखल

सावंतवाडी : कुडाळ येथे शनिवारी शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या खडाजंगी प्रकरणी आमदार वैभव नाईक यांच्यासह ४० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुडाळ येथे शनिवारी सकाळी आमदार वैभव नाईक व त्याचे कार्यकर्ते भारत पेट्रोल पंपावर आल्यानंतर भाजप सेना कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे वातावरण तंग झाले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जमावबंदीचे उल्लंघन केले. याप्रकरणी […]