उत्तर महाराष्ट् बातमी

सॅनिटायजरमुळे पेटली कार; राष्ट्रवादीच्या नेत्याचा जागीच मृत्यू

पिंपळगांव बसवंत : सॅनिटायजरमुळे कार पेटल्याने राष्ट्रवादीच्या नेत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबई आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत टोल प्लाझा येथे घडली आहे. कारमधील वायरींगचे शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यात सॅनीटायझरने पेट घेतला. या आगीने कार लॅाक झाली. त्यामुळे पेटलेल्या कारमध्ये अडकलेले राष्ट्रवादी कॅांग्रेसचे नेते संजय चंद्रभान शिंदे यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. साकोरे मीग (निफाड) जवळ […]

उत्तर महाराष्ट् बातमी

माजी सैनिकाला मारहाण; गृहमंत्री देशमुख यांच्याकडून भाजप खासदाराच्या चौकशीचे आदेश

जळगाव : माजी सैनिकाला मारहाण केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेश पाटील यांच्या चौकशीचे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. २०१६ साली भाजपचे तत्कालिन आमदार असलेल्या उन्मेष पाटील यांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. मात्र, त्याप्रकरणी तत्कालिन भाजप सरकारने कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. याप्रकरणी निवदेन आल्याने त्यांच्या चौकशीचे आदेश […]

उत्तर महाराष्ट् बातमी

मशिदी उघडणार म्हणण्याची इम्तियाज जलील यांची हिंमत कशी होते?

नाशिक : नाशिकमधील काही साधू, महंतांनी एकत्र येत राज्यसरकारला 29 ऑगस्टपर्यंत मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे. अन्यथा राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करु, असा इशाराही दिला आहे. तर विरोधी पक्ष भाजपचाही या घंटानाद आंदोलनाला पाठिंबा असल्याची माहिती समोर आली आहे. साधू, महंतांच्यावतीने अध्यात्मिक समनव्य आघाडीचे समन्वय आचार्य तुषार भोसले यांनी भूमिका मांडली. राज्यात मदिरा सुरु आहे, पण […]

उत्तर महाराष्ट् बातमी

एकनाथ खडसेंना वाढीव बिलाचा शॉक; एका महिन्यात आलंय एवढं बिल

जळगाव : राज्यात सध्या वाढीव वीज बिलामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशात भाजपनेते एकनाथ खडसे यांनाही वाढीव वीज बीलाचा शॉक बसला आहे. एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरातील घराचे वीजबिल भरमसाठ आले आहे. लॉकडाऊन काळात एकनाथ खडसे यांना 1 लाख चार हजाराचे बिल आल्याने, त्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. लॉकडाऊन काळात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वाढीव […]

उत्तर महाराष्ट् बातमी

धक्कादायक ! संशयित कोरोना रुग्णाने रुग्णवाहिकेतून मारली उडी; झाला मृत्यू

नाशिक : कोरोनाबाधिताच्या संपर्कातील एका व्यक्तीला नाशिक शहरातील नासर्डी पुलालगतच्या विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. रुग्णवाहिकेतून त्याला महापालिकेच्या अथवा खासगी रुग्णालयात नेले जाणार असतांना संबंधिताने दरवाजा उघडून पळ काढला. आपल्या मोटारसायकलवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात हृदयविकाराच्या धक्क्याने तो कोसळला. त्यास तातडीने डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या संशयित रुग्णाचा भीतीपोटी […]