कांद्याला कवडीमोल भाव; घरी नऊजण खाणारे, 25 वर्षीय शेतकऱ्याने उचललं नको ते पाऊल
शेती

कांद्याला कवडीमोल भाव; घरी नऊजण खाणारे, 25 वर्षीय शेतकऱ्याने उचललं नको ते पाऊल

  शेतात पिकवलेल्या कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने हातात पैसे नाहीत, कुटुंबातील नऊ जणांची जबाबदारी, कर्ज कसे फेडायचे या संभ्रमात असलेल्या बीडच्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची चर्चा केली जात आहे. संभाजी अर्जुन अष्टेकर असे हे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याने आपल्या शेतात गळफास घेतल्याचे आज उघडकीस आले आहे. संभाजी अष्टेकर यांच्यावर […]

राज्यात ‘शेत तेथे मत्स्यतळे’ योजना राबविणार; आता शेततळ्यात मत्स्यपालन करता येणार?
शेती

राज्यात ‘शेत तेथे मत्स्यतळे’ योजना राबविणार; आता शेततळ्यात मत्स्यपालन करता येणार?

मुंबई : प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेततळ्यात सहजतेने मत्स्यपालन करता यावे यासाठी ‘शेत तेथे मत्स्यतळे’ योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ससून डॉक येथे सागर परिक्रमा कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केली. केंद्रीय मत्स्यपालन मंत्री परषोत्तम रुपाला यांच्या सागर परिक्रमेच्या तिसऱ्या टप्प्याच्या सांगता सभेत त्यांनी या योजनेचे सूतोवाच केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत […]

शेतकऱ्याने रानडुकरांना केलं कन्फ्यूज, शेतकऱ्याची भन्नाट आयडिया, अचानक तोंडाला फेस
शेती

शेतकऱ्याने रानडुकरांना केलं कन्फ्यूज, शेतकऱ्याची भन्नाट आयडिया, अचानक तोंडाला फेस

अमरावती : शेतकरी आपल्या जीवाचे रान करत शेतात पेरलेले पीक उभे करतो. मात्र, कधी नैसर्गिक तर कधी वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी हतबल झाल्याचे अनेकदा दिसून येतं. मात्र अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पिकांची नासाडी करणाऱ्या जंगली डुकरांपासून पीक वाचवलं आहे. त्यासाठी शेतकऱ्यानं चक्क भन्नाट कल्पना प्रत्यक्षात आणली आहे.आपलं पीक सही सलामत ठेवल्याने त्या शेतकऱ्याचे अमरावती जिल्ह्यात […]

राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना
शेती

राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना

महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत असून शेतकरी आत्महत्या रोखून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी आज राष्ट्रीय नैसर्गिक शेती आणि डिजिटल शेती यावरील कार्यशाळेत दिली. नवी दिल्ली येथे आयोजित या राष्ट्रीय कार्यशाळेत मुख्यमंत्री […]

टोमॅटोबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, राज्य सरकारला दिले हे आदेश
शेती

टोमॅटोबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, राज्य सरकारला दिले हे आदेश

नवी दिल्ली : देशात टोमॅटोचे भाव पडल्यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एमआयएस योजनेअंतर्गत राज्य सरकारांनी शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करावेत, अशी सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पियुष गोयल आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्याशी याबाबत चर्चा केली. महाराष्ट्रातील शेतकरी सध्या टोमॅटोच्या प्रश्नावरून […]

सोयाबीनच्या भावात दोन हजार रुपयांची घसरण; हे आहे कारण
शेती

सोयाबीनच्या भावात दोन हजार रुपयांची घसरण; हे आहे कारण

लातूर : सोयाबीन उत्पादक देशातील हवामान बदलाच्या फटक्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार असल्याने सोयाबीनच्या भावात विक्रमी वाढ झाली होती. चार दिवसांपूर्वी वायदे बाजारात सोयाबीनचा भाव १० हजार ३०० रुपये होता. सोयाबीनचा भाव आठ हजार ३०० रुपये क्विंटल झाला तर वायदे बाजारातील भाव आठ हजार ४६६ रुपये इतका घसरला आहे. भावांत घसरण होण्याचे कारण पोल्ट्री फॉर्म […]

मोठी बातमी : शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज
शेती

मोठी बातमी : शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज

मुंबई : पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. एक लाख ते तीन लाखांच्या कर्ज मर्यादेत विहीत मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास सध्याच्या एक टक्के व्याजदरात आणखी दोन टक्के व्याज दर सवलत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. उपमुख्यमंत्री अजित […]

ही आहे जगातील सर्वात महागडी भाजी; किलोला मोजावे लागतात लाख रुपये
शेती

ही आहे जगातील सर्वात महागडी भाजी; किलोला मोजावे लागतात लाख रुपये

औरंगाबाद (बिहार) : बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने हॉप शूट्स नावाच्या भाजीची लागवड केली असून या भाजीची किंमत एक लाख रुपये प्रतिकिलो असल्याचे सांगण्यात येत आहे. बिहारमधील नवीननगर ब्लॉकमधील करमडीह गावातील ३८ वर्षीय शेतकरी अमरेश सिंह हे या भाजीचं उत्पादन घेणारे पहिले भारतीय शेतकरी ठरले आहेत. सहा वर्षांपूर्वी त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारापेठेमध्ये एका किलो हॉप […]

अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना २१९२ कोटीचा निधी वितरीत
शेती

अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना २१९२ कोटीचा निधी वितरीत

मुंबई : जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या दुसऱ्या हप्त्यापोटी २ हजार १९२ कोटी ८९ लाख ५ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत राज्यात […]

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; अखेर कांद्यावरील निर्यातबंदी उठवली
शेती

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; अखेर कांद्यावरील निर्यातबंदी उठवली

नाशिक : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक निर्णय घेतला असून कांद्यावरील निर्यातबंदी हटवली आहे. केंद्र सरकारने नाशिक जिल्ह्यासह देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. सरकारच्या आदेशानुसार येत्या एक जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे. कांदा उत्पादकांना केंद्राच्या या निर्णयाने नववर्षाच्या सुरुवातीस सुखद धक्का दिला आहे. केंद्राच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत विदेश व्यापार संचलनालयाने सूचना काढून कांद्याच्या निर्यातबंदी […]