कुस्तीपटू सुशील कुमारविरोधात अजामीनपात्र वॉरंट
क्रीडा

कुस्तीपटू सुशील कुमारविरोधात अजामीनपात्र वॉरंट

नवी दिल्ली : भारताचा कुस्तीपटू सुशील कुमारविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये झालेल्या खुनाच्या घटनेमध्ये दिल्ली पोलीस सुशील कुमारचा शोध घेत आहेत. मात्र, ही घटना उघड झाल्यापासून सुशील कुमार पोलिसांना सापडला नसल्यामुळे त्याच्याविरोधात आधी पोलिसांनी लुकआऊट नोटीस काढली होती. त्यानंतर देखील सुशील कुमारचा शोध न लागल्यामुळे त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. […]