वाढदिवसादिवशी ज्युनिअर एनटीआरकडून चाहत्यांना भेट
मनोरंजन

वाढदिवसादिवशी ज्युनिअर एनटीआरकडून चाहत्यांना भेट

चेन्नई : गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा आगामी चित्रपट आरआरआर चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटातील ज्युनिअर एनटीआरचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. आज (ता. २०) सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आरआरआर या चित्रपटातील त्याचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. राजमौली यांनी ट्विटर अकाऊंटवर ज्युनिअर एनटीआरचा लूक शेअर केला असून सध्या चर्चेत आहे. […]