वाढदिवसादिवशी ज्युनिअर एनटीआरकडून चाहत्यांना भेट
मनोरंजन

वाढदिवसादिवशी ज्युनिअर एनटीआरकडून चाहत्यांना भेट

चेन्नई : गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा आगामी चित्रपट आरआरआर चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटातील ज्युनिअर एनटीआरचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. आज (ता. २०) सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आरआरआर या चित्रपटातील त्याचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. राजमौली यांनी ट्विटर अकाऊंटवर ज्युनिअर एनटीआरचा लूक शेअर केला असून सध्या चर्चेत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आरआरआर चित्रपटामध्ये ज्युनिअर एनटीआर हा कोमराम भीम ही भूमिका साकारणार आहे. या पूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरवरुन चित्रपटाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील असल्याचे दिसत होते. तसेच चित्रपटाची कथा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील अलुरी सिथारामराजु व कोमराम भीम या स्वातंत्र्यवीरांवर आधारित आहे.

ज्युनिअर एनटीआर सोबत राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट, ओलिविया मॉरिस हे कलाकारही स्क्रीन शेअर करणार आहेत. हा चित्रपट ८ जानेवारी २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.