पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवादरम्यान पुण्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पुणे शहरामध्ये १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबरपर्यंत १४४ कलम लावण्यात आलं आहे. पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून पोलीस आयुक्तालय क्षेत्रात जमावबंदी, प्रार्थनास्थळंबंद ठेवण्यासंबंधी तसेच संचारास मनाई करणारे आदेश लागू केले आहेत. दरम्यान […]