चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेत्री चित्रा हिने नुकतीच आत्महत्या केली आहे. यानंतर काही धक्कादायक माहिती समोर आली असून चित्राच्या आईने तिच्या पतीने आपल्या मुलीची मारहाण करुन हत्या केल्याचा आरोप केला आहे. शवविच्छेदन अहलावातून मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचं निष्पन्न झालं असून आर्थिक समस्यांमुळे आत्महत्या केल्याची शक्यता तपासात समोर येत आहे. चित्राचा पती हेमनाथ याच्यावर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप […]