अभिनेत्री चित्राच्या आत्महत्या प्रकरणा मोठी माहिती उघड; पतीला अटक
मनोरंजन

अभिनेत्री चित्राच्या आत्महत्या प्रकरणा मोठी माहिती उघड; पतीला अटक

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेत्री चित्रा हिने नुकतीच आत्महत्या केली आहे. यानंतर काही धक्कादायक माहिती समोर आली असून चित्राच्या आईने तिच्या पतीने आपल्या मुलीची मारहाण करुन हत्या केल्याचा आरोप केला आहे. शवविच्छेदन अहलावातून मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचं निष्पन्न झालं असून आर्थिक समस्यांमुळे आत्महत्या केल्याची शक्यता तपासात समोर येत आहे. चित्राचा पती हेमनाथ याच्यावर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२९ वर्षीय चित्राचा १० डिसेंबरला हॉटेलमध्ये मृतदेह आढळला होता. काही महिन्यांपूर्वीच चित्राचं लग्न झालं होतं. काही मालिकांमध्ये चित्राने बोल्ड सीन दिल्याने हेमनाथ नाराज होता असं तपासात समोर आलं आहे. हेमनाथला तिने टीव्ही मालिकेत दिलेला सीन आवडला नव्हता. ज्या दिवशी चित्राचा मृत्यू झाला, त्यादिवशी त्याने दिला धक्काही दिला होता, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त सुदर्शन यांनी एनडीटीव्हीशी बोलताना दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हेमनाथची चौकशी सुरु होता. चित्राचे मित्र आणि सेटवरील सहकाऱ्यांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात रात्री उशिरा शूटिंग संपल्यानंतर चित्रा आणि हेमनाथ हॉटेलमध्ये गेले होते. चित्राने स्वत:ला लॉक करुन घेतलं होतं. हॉटेल कर्मचाऱ्यांकडून डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने रुम उघडून पाहिली असता तिचा मृतदेह आढळला असं हेमनाथने पोलिसांना सांगितलं होतं.