बंगळुरु : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) सहकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेंगळुरूमध्ये आयोजित अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत होसबळे यांची सरकार्यवाह म्हणून नियुक्ती करण्यात आली. मावळते सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची ते जागा घेणार आहेत. 65 वर्षीय दत्तात्रय होसबळे हे संघाचे 2009 पासून सह-सरकार्यवाह म्हणून काम पाहत होते. दत्तात्रय होसबळे हे मूळ कर्नाटकमधील आहेत. […]