आरएसएस’च्या सहकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची नियुक्ती
राजकारण

आरएसएस’च्या सहकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची नियुक्ती

बंगळुरु : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) सहकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेंगळुरूमध्ये आयोजित अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत होसबळे यांची सरकार्यवाह म्हणून नियुक्ती करण्यात आली. मावळते सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची ते जागा घेणार आहेत. 65 वर्षीय दत्तात्रय होसबळे हे संघाचे 2009 पासून सह-सरकार्यवाह म्हणून काम पाहत होते. दत्तात्रय होसबळे हे मूळ कर्नाटकमधील आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सरकार्यवाह’पदी निवड झाल्यानंतर संघाशी निगडीत व्यवहारिक आणि तात्विक विषयांवर निर्णय घेण्याची जबाबदारी होसबळे यांच्यावर असेल. ‘आरएसएस’मध्ये सरकार्यवाहांची एक स्वतंत्र टीम काम करत असते. त्यांना केंद्रीय कार्यकारिणी म्हटलं जातं. दरम्यान, आज झालेल्या बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सद्य सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत होसबळे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर होसबळे यांची या पदावर एकमताने निवड करण्यात आली.

दत्तात्रय होसबळे यांनी संघाचे प्रचारक बनून पूर्णकालीन संघाचेच काम केले आहे. दत्ताजी होसबळे हे स्वतः त्यांच्या शिक्षणाच्या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत होते. त्यानंतर संघाने त्यांना जवळ जवळ 15 वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री म्हणून काम दिले. या काळात विद्यार्थी परिषदेचा देशाच्या पूर्वोत्तर भागापासून तर अंदमान निकोबार पर्यंत मोठा विस्तार झाला.

वर्ष 2004 मध्ये संघाने बौद्धिक प्रमुख देखील बनवले. दत्तात्रय होसबळे हे इंग्लिश लिटरेचर मध्ये पदव्युत्तर असून त्यांचे संस्कृत आणि त्यांची मातृभाषा कन्नड आहे याशिवाय अनेक भाषांवर प्रभुत्व आहे. देशविदेशात त्यांनी संघाची विचारधारा वेगवेगळ्या कार्यक्रमात मांडली आहे. नेपाळ भूकंपाच्या वेळी स्वतः तिथे जाऊन त्यांनी सेवाकार्यात मदत केली होती.

विद्यार्थी काळात लादलेल्या आणीबाणीत दत्तात्रय होसबळे हे मिसा कायद्या अंतर्गत जेलमध्ये होते. कन्नड भाषेतील असिमा नावाच्या मासिकाचे ते संस्थापक संपादक ही आहेत. दत्तात्रय होसबळे हे इंडियन पॉलिसी फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त आहेत. ही संघटना एनजीओ असून दिल्लीत आहे. सामाजिक अभ्यास आणि संशोधनाद्वारे समाजाला इतिहासाचे अॅनॅलिसिस, आजची परिस्थितीचे योग्य आकलन करायला मदत आणि उद्या येणाऱ्या परिस्थितीची जाणीव करून देणे हे इंडियन पॉलिसी फाऊंडेशनचे ध्येय आहे.